शाश्वत स्वच्छतेसाठी घोषवाक्य लेखन स्पर्धा जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींनी सहभागी व्हावे - डॉ. मिताली सेठी.






शाश्वत स्वच्छतेसाठी घोषवाक्य लेखन स्पर्धा

जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींनी सहभागी व्हावे - डॉ. मिताली सेठी.


दिनचर्या न्युज :-

चंद्रपुर (प्रतिनिधी) दिनांकः 10/09/2021 ग्रामीण भागामध्ये स्वच्छतेची संस्कृती रुजावी आणि लोकसहभागातून शाश्वत स्वच्छता टिकून राहावी म्हणून राज्याच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाच्या वतीने घोषवाक्य लेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. चंद्रपुर जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींनी घोषवाक्य लेखण स्पर्धेत सहभागी व्हावे . असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मिताली सेठी यांनी केले .

केंद्र शासनाच्या हागणदारीमुक्त अधिक (ओडीएफ प्लस) या संकल्पनेवर आधारित दिनांक 1 सप्टेंबर ते 15ऑक्टोबर 2021 या कालावधीमध्ये घोषवाक्य लेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायती / वाडी / वस्ती मध्ये या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.यामध्ये शौचालयाचा नियमित वापर, लहान बाळाच्या विष्ठेचे व्यवस्थापनसांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनगोबर्धन ओलासुका व प्लास्टिक कचरा विलगीकरण अशा विविध घटकांचा समावेश करण्यात आला आहे.स्वच्छता विषयक संदेश असलेले घोषवाक्यांचे लेखन गावातील शाळाअंगणवाडीप्राथमिक आरोग्य केंद्रबाजार पेठसरकारी दवाखानेबस स्थानकपोस्ट ऑफिससार्वजनिक जागा अशा विविध दर्शनी भागावर करावयाचे आहे.

 

   तालुकास्तरावर सदर स्पर्धेचे सनियंत्रण व गावातील घोषवाक्यांची तपासणी पंचायत समितीचे गट विकास अधिकारी करणार आहेत. उत्कृष्ट घोषवाक्य लिहिणाऱ्या ग्रामपंचायतीचा गौरव दि. 2ऑक्टोबर 2021 रोजी जिल्हास्तरावर करण्यात येणार आहे, तर उत्कृष्ट काम करणाऱ्या तीन जिल्ह्यांचा सन्मान राज्यस्तरावर होणार आहे. दरम्यान घोषवाक्य लेखन स्पर्धेमध्ये जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींनी सक्रिय सहभाग नोंदवून आपले गाव स्वच्छ व सुंदर बनविण्यासाठी योगदान द्यावे असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मिताली सेठी  यांनी केले .