जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या आढावा व कार्यकर्ता बैठकीत खा. सुप्रिया सुळेनी अनेक विषयांवर साधला संवाद!
दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
चंद्रपूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस ग्रामीण ची आढावा सभा आज चंद्रपूरला जनता महाविद्यालयाच्या प्रांगणात राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्या उत्कृष्ठ संसदपटू सौ.सुप्रियाताई सुळे यांच्या मुख्य उपस्थितीत पार पडली. आजच्या सभेच्या अध्यक्षस्थानी श्री.मोरेश्वर टेमुर्डे होते तर प्रमुख उपस्थितीत चंद्रपूर जिल्ह्याच्या संपर्क प्रमुख श्री.मधुकर कुकडे व दुसरे संपर्क प्रमुख मा.श्री.सुबोध मोहिते,जिल्ह्याचे पक्ष निरीक्षक आ.मनोहर चंद्रिकापुरे, आदितीताई नलावाडे,जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य,डॉ.अशोक जीवतोडे, माजी महिला प्रदेश अध्यक्ष सौ. सुरेखाताई ठाकरे,महिला अध्यक्षा सौ.बेबीताई उईके,श्री.बाबासाहेब वासाडे,सौ.वैशालीताई वासाडे,शोभाताई पोटदुखे,नितीन भटारकर,महादेवराव पिदुरकर,पंकज पवार,अरुण निमजे,मेहमूद मुसा,सुनील दहेगावकर,डॉ.श्याम मोहरकर,जगदीश जूनगरी,सुजित उपरे,सतीश मिनगुलवार डॉ.बाळकृष्ण भगत,प्रदीप ढाले,राजेंद्र ताजने,उल्हास करपे,दीपक जैस्वाल,विलास नेरकर,सुमित समर्थ,सुधाकर कातकर, मोंटू पिलारे,डॉ.रघुनाथ बोरकर,इत्यादी उपस्थित होते, जिल्हाध्यक्ष श्री राजेंद्र वैद्य यांनी प्रास्ताविक करतांना जिल्ह्यातील पक्षबांधणीचा अहवाल मांडला,सोबतच आगामी जिल्हा परिषद,नगर पालिका,व नगर पंचायत निवडणुकी साठी पक्षाची स्वबळावर लढण्याची देखील तयारी असल्याबंतची माहिती दिली, जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या विकास कामांच्या निधी उपलब्धतेबाबत काँग्रेस कडून होत असलेला दूजाभाव लक्षात आणून दिला. पक्ष निरीक्षक आ.मनोहर चंद्रिकापुरे त्याच प्रमाणे,पक्षाचे संपर्क प्रमुख श्री.सुबोध मोहिते व श्री.मधुकर कुकडे यांनी देखील आपले विचार मांडले.
खा.सुप्रियाताई सुळे यांनी जिल्ह्यातील प्रदूषणाच्या प्रश्नावर पर्यावरण मंत्री ना.आदित्य ठाकरे,उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार व जिल्ह्यातील नेत्यांची लवकरच मुंबईत बैठक लावून हा प्रश्न हाती घेत असल्याची ग्वाही दिली.वाढती महागाई, लखिमपुरच्या घटने बाबत केंद्र सरकारवर ताशेरे ओढले,ED चा होत असलेला गरीवापर बाबाठी त्यांनी नाराजी व्यक्त केली,ओबीसी च्या प्रश्नावर सुद्धा केंद्र सरकारच्या भूमिकेवर त्यांनी नाराजी व्यक्त केली.जिल्ह्यात २०२२ मधील विधानसभेच्या निवडणुकीत ३ जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस दावा करेल आणि त्याकरिता येणाऱ्या न.पंचायत,न.पालिका, जि.प. पं.स. निवडणुकांमध्ये पक्षाचे जास्तीत जास्त सदस्य निवडून आणण्यासाठी जिल्ह्यात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आतापासून कामाला लागून पक्ष संघात बळकट करण्याचे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले. मोरेश्वर टेमुर्डे यांनी अध्यक्षीय भाषण केले,तर नितीन भटारकर यांनी आभार प्रदर्शन केले. प्रचंड संख्येने जिल्हाच्या कानाकोपऱ्यातून राष्ट्रवादीचे पदाधिकारी,शहर व तालुक्यांचे अध्यक्ष,महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.