सरपंच सुरज तोतडे यांनी केली पांढरकवडा येथे कोविड लसची मागणी
दिनचर्या न्युज
चंद्रपूर :-
जिल्ह्यातील चंद्रपूर तालुक्यातील पांढरकवडा येथे कोविड लस देण्यात यावी अशी मागणी येथील सरपंच सुरज तोतडे यांनी पंचायत समितीचे बिडीआओ यांना केली आहे. गावातील नागरिकांनी कोविड वॅक्सिनचा दुसरा डोज देण्यात यावा गावातील 200 च्या वर दुसर्या डोज लसीकरण बाकी असून लवकरात लवकर लस उपलब्ध करून देण्यात यावी अशी मागणी केली आहे. अजूनही कोरोना संपलेला नसून, त्या संदर्भातली सर्व नियम अटींचे पालन करण्याचे आवाहनही सरपंच यांनी केले आहे.