अबब :चक्क ग्रामपंचायत मध्ये ढोकसलेल्या आढळल्या दारूच्या रिकाम्या बाटल्या!

अबब :चक्क ग्रामपंचायत मध्ये ढोकसलेल्या आढळल्या दारूच्या रिकाम्या बाटल्या!

सखारवाही येथील सरपंच्याचा भोंगळ कारभार*


ग्राम पंचायत मध्येच बियर बार सुरु

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
आज दि.25 नोव्हेबर 2021 ला सखरवाही ग्राम पंचायत मध्ये ग्रामसभा असल्यामुळे गावकारी तिथे उपस्थित होते. त्या दरम्यान ग्राम पंचायत सदस्य श्री विनोद खापने यानी गावातील लोकांना दारुच्या बाटल्या ग्रामपंचायत मध्ये ठेऊन असलेल्या दाखवलया व त्याचे वीडियो आणि फ़ोटो काढून गट विकास अधिकारी चंदपुर यांच्याशी संपर्क केला.ग्राम पंचायत ही गावकर्यांच्या सेवेचे मंदिर आहे.त्याच ग्राम पंचायत मधून दिन,दुर्बल,शोषित,पीड़ित, अंध,अपंग आशा लोकांना न्याय देणार मंदिर समजतो. मात्र ग्रामपंचायत मध्ये ढोकसलेल्या आढळल्या दारूच्या बाटल्या. त्याच मंदिरात दारू पिऊन खाली बाटल्या मिळत असेल तर लोकांना काय न्याय दायचा हि चिंता जनक बाब आहे. आणि म्हणून गट विकास अधिकारी साहेबाना बोलावुन त्याच्या समक्ष त्या बाटलाची चौकशी करण्यात आली. त्या वेळी ग्रामपंचायत चे सरपंच नागेश बोंडे म्हणाले की है कोणाच तरी क्षळयंत्र आहे. त्या बाटल्या आम्हच्या नाही कोनी तरी ठेवल्या असाव्या त्या नंतर लगेच त्यानी आपल्या शब्दांना पलटी मारून पानी टेस्टिंग करिता आम्ही जमा करून आनलया असे सांगितले परंतु त्या बाटलांची चौकशी करत असताना बातलांचे सील सुद्धा बॉटल मधेच टाकून आढळले.
त्याच वेळी गट विकास अधिकारी यांच्या समोर चौकशी करण्यात आली व त्यानी मान्य केले की ह्या दारुच्या बाटल्या आहे आणि जर ह्या बाटला जमा केलेल्या असत्या तर त्या बॉटल मधे सील दिसले नसते असे बोलून प्रत्येकाचे बयान घेऊन गट विकास अधिकारी यानी सांगितले की आपन पोलिस तक्रार करून बाटलाना कोनी हात लावला आहे आणि कोनी ठेवल्या आहे. हे माहिती घेण्या करिता फिंगरप्रिंट ची चाचणी करून कारवाही करू असे म्हणून सांगितले.
या नंतर ग्राम पंचायत सदस्य श्री विनोद खापने यांनी पोलिस स्टेशन ला तक्रार करून या सर्व बाबिंची तात्काळ चौकशी करुण कठोर करवाई करण्याची मागणी श्री विनोद खापने यांनी केली.

दिनचर्या न्युज