थकबाकीदार, वीजचोर, १ ते ३० युनिट तथा शुन्य वीजवापर असणारे ग्राहक महावितरणच्या रडारवर


थकबाकीदार, वीजचोर, १ ते ३० युनिट तथा शुन्य वीजवापर असणारे ग्राहक महावितरणच्या रडारवर

विशेष मोहिमेत सापडले १८० वीजचोरी करणारे ग्राहक

- १९ हजार २१२ थकबाकीदारांनाही झटका

चंद्रपूर दिनांक ०९ नोव्हेंबर २०२१

दिनचर्या न्युज
चंद्रपूर :-
महावितरणच्या चंद्रपूर परिमंडळात थकबाकीदार ग्राहकांकडून वीजबिल वसुली, वीजपुरवठा खंडीत करण्याची कारवाई तसेच संशयास्पद वीजवापर ज्यात १ ते ३० युनिट वीजवापर व शुन्य वीजवापर असणारे ग्राहक तसेच वीजवापराच्या प्रमाणात वीजबिल न येणारे ग्राहकांविरोधात विशेष मोहिम राबविण्यात येत असून गेल्या ४० दिवसात १९ हजार २१२ ग्राहकांचा वीजपुरवठा २७ कोटी ६५ लाखाच्या थकबाकीसाठी ख्ंडीत करण्यात आला तसेच १८० वीजचोरीच्या घटना महावितरणच्या विशेष चमू सोबतच महावितरणचे अभियंता, अधिकारी व कर्मचारी यांनी उघडकिस आणल्या. महावितरणद्वारा गठीत या चमुंद्वारा संध्याकाळ ते सकाळ दरम्यान थकबाकीसाठी वीजपुरवठा खंडीत करण्यात आलेल्या ग्राहकांचा तसेच कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडीत ग्राहकांवर करडी नजर ठेवण्यात येत आहे.

आतापर्यंत १ ते ३० युनिट वीजवापर असलेल्या ५८ हजार ८५५ ग्राहकांचा वीजवापर तपासण्यात आला आहे. त्यात ९३० वीजग्राहकांचे वीजमीटर संथगतीने फिरतांना आढळले तर शुन्य वापर असलेल्या ९ हजार १३३ ग्राहकांपैकी ५ हजार ८३१ ग्राहकांचा वीजवापर व वीजमीटर तपासण्यात आले व १३९ वीजमीटर संथ तर १४० मीटर बंद आढळले. या विशेष मोहिमेत १८० ग्राहकांनी मीटरमध्ये छेडछाड करुन वीजचोरी केल्याचे उघडकिस आले.

वीजबिल भरण्याच्या घरबसल्या सुविधां उपलब्ध असतांनाही अनेक ग्राहकांनी ऑक्टोबर २०२० पासून ऑक्टोबर २०२१ या १२ महिण्यांत , वीजबिल भरलेले नाही. महावितरणच्या अस्तित्वासाठी ग्राहकांनी वापरलेल्या प्रत्येक युनिटची वसुली अत्यावश्यक असून सध्या महावितरण आर्थिक बिकट परिस्थितीला सामोरे जात आहे. वीजग्राहकांनी वापरलेल्या वीजेचे बील वेळेवर स्वतःहून भरणे अपेक्षित असतांना महावितरणच्या अधिकारी व कर्मचा़री यांना थकबाकी वसुली करीता ग्राहकांच्या दारापर्यंत जावे लागत आहे. ही मोहिम पुढे अशीच धडकपणे राबविण्यात येणार असून महावितरणचे अभियंता्, अधिकारी व कर्मचारी महावितरणच्या अस्तित्वासाठी मैदानात उतरले आहेत.

 

       चंद्रपूर व गडचिरोली जिल्हयातील घरगुती, वाणिज्यिक, औदयोगिक,  सरकारी कार्यालये ,  इतर लघुदाब, पाणीपुरवठा योजणा, कृषिपंपधारक व पथदिवे या ग्राहकांकडे  ऑक्टोबर २०२१पर्यंत थकबाकी एकूण थकबाकी ४२१ कोटी  झाली आहे. मागील वर्षाची ९९ कोटी ३३ लाख येणे आहेच. कृषिपंपधारकांसाठी नवीन कृषि उर्जा धोरणामधून थकबाकीमुक्त होण्याची संधी आहे. या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन महावितरणद्वारा करण्यात येत आहे.


     थकबाकीसाठी चंद्रपूर व गडचिरोली जिल्हयातील घरगुती, वाणिज्यिक, औदयोगिक,  सरकारी कार्यालये व इतर लघुदाब ग्राहक अशा एकूण १९ हजार २१२  वीज ग्राहकांचा वीजपुरवठा ऑक्टोबर २०२० ते ऑक्टोबर २०२० कालावधीत (आतापर्यंत) खंडीत करण्यात आला.  थकबाकीसाठी वीजपुरवठा खंडित  झाल्यावर वीजनियामक आयोगाच्या निर्देषानुसार नियमाप्रमाणे पुणर्जेाडणी शुल्क आकारण्यात येत आहे.

 .   आठवडयाचे सातही दिवस थकबाकीदारांविरोधात मोहिम राबविण्यात येत आहे. वीजपुरवठा खंडीत करण्यात आलेल्या ग्राहकंाकडून अनधिकृत वीज वापर आढल्यास वीजकायदा २००३ च्या कलम १३५ व कलम १३८ अंतर्गत कारवाई करण्यात येत आहे . ग्राहकांना वीजबिल भरणे सोईचे व्हावे यासाठी प्रत्येक सुटीच्या दिवशीही वीजबिल भरणा केंद्र सुरू ठेवण्यात आहेत

       थकबाकीदारांना. वीज बिलांचा भरणा करण्यासाठी महावितरणद्वारा ग्राहकांना पर्यावरणपुरक ऑनलाईन पेमेंट, मोबाईल अॅप, गुगल पे,पेटीएम या यासारख्या ग्राहकाभिमुख सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या असून नियीमत ग्राहकांचा प्रतिसादही या सुविधांना चागल्याप्रकारे लाभत आहे.वीजग्राहकांनी  वीजबिलांचा भरणा करून सहकार्य करावे, असे आवाहन मुख्य अभियंता श्री.सुनिल देशपांडे यंानी केले आहे.