आयुर्वेदाने डायबेटीसची समस्या होऊ शकते दूर: JAPI 'जापी मध्ये रिसर्च पेपर सादर माधवबागच्या संशोधनाला जापीची मान्यता

आयुर्वेदाने डायबेटीसची समस्या होऊ शकते दूर: JAPI 'जापी मध्ये रिसर्च पेपर सादर माधवबागच्या संशोधनाला जापीची मान्यता:

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
जागतिक आरोग्य संघटनेनुसार भारत ही आता मधुमेहाची राजधानी आहे. देशात मोठ्या प्रमाणात मधुमेह रुग्ण वाढत आहे आज पाहिलं तर प्रत्येक एक घर सोडून एकतरी मधुमेही रुग्ण हा असतोच, शिवाय एकदा का मधुमेह झाला" की तो कधीच बरा होत नाही. त्याला नियंत्रणात ठेवण्यासाठी आयुष्यभर औषधं किंवा इन्सुलिन घ्यावे लागतात असा समज समाजात पसरलेला आहे. तसंच डायबेटीसमुळे हृदयरोग, हार्ट अटॅक, किडनी फेल्युअर, नजर कमजोर होणे अशा कॉम्प्लिकेशन्सना चाळीशी पुढीलच नाही तर तीस वर्षांखालील तरुण पिढीही या गंभीर समस्यांचा सामना करत असल्याचं दिसून येत आहे. याचं महत्वाचं कारण म्हणजेच बदललेली व चुकीची जीवनशैली आणि आजाराविषयीची असलेली अपुरी माहिती. पण आयुर्वेदिक पंचकर्म पद्धती ही डायबेटीस रुग्णांसाठी आयुर्वेदातील संजीवनी ठरली आहे. आयुर्वेदातील पंचकर्म पद्धतीने टाईप 2 डायबेटीस पूर्णपणे बरा होऊ शकतो असे संशोधनाने सिद्ध झाले आहे. अशी माहिती माधवबागचे विदर्भ रिजनल हेड डॉक्टर उन्मेष पनवेलकर यांनी पत्रकार परिषदेत दिली यावेळी मुंबई येथील रिसर्च अॅन्ड डेव्हलपमेंट हेड डॉ.राहुल मांडोळे यांनी या संशोधनाबद्दल तपशीलवार सांगितले कोणत माधवबागच्या उपचाराने अनेक रुग्णांनी डायबेटीसवर मात केली असून उपचारानंतर तीन ते चार वर्षांनंतरही त्यांच्य शरीरातील रक्तातील साखर नॉर्मल असून ते मेडिसिन मुक्त जीवन जगत आहेत.
माधवबागने केलेल्या या संशोधनाला जर्नल ऑफ असोसिएशन ऑफ फिजिशियन्स ऑफ इंडिया (JAPI) या. जगप्रसिद्ध संस्थेने रिसर्च पेपरद्वारे मान्यता दिली असल्याची माहितीही डॉ. राहुल मॉडोळे यांनी दिली. डायबेटीसवर नियंत्रण मिळवण्यासाठी आतापर्यंत अनेक संशोधन करण्यात आली. अनेक अॅडव्हान्स ट्रिटमेंटही आल्या पण तरीही मधुमेही रुग्णांच्या संख्येत कोणतीही घट होताना दिसून येत नव्हती. त्यात आयुर्वेदिक पंचकर्म व डाएटच्या मदतीने डायबेटीस रिव्हर्स होऊ शकतो याविषयी लोकांच्या मनात प्रश्नचिन्हच उभ राहतं. आयुर्वेदिक ट्रिटमेंट सगळ्यांनाच सूट होत नाही, आयुर्वेदिक ट्रिटमेंटने आजार बरा व्हायला खूप उशीर लागतो शिवाय आयुर्वेदिक पंचकर्म चालू आहे तोपर्यंत कदाचित डायबेटीस कंट्रोलमध्ये दिसेलही पण ट्रिटमेंट थांबवल्या नंतर डायबेटीस कंट्रोलमध्ये राहील कार पुन्हा डायबेटीस होणार नाही का? अशा गैरसमजातून निर्माण झालेल्या या प्रश्नांनी आयुर्वेदावर नेहमी शंका दाखवली जाते. याच अनुषंगाने आयुर्वेदाविषयी असलेली शंका आणि डायबेटीस रुग्णांच्या मनात येणाऱ्या या प्रश्नाची उत्तर देण्यासाठी म्हणून आयुर्वेदिक पंचकर्म पद्धतीने उपचार करण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या माधवबाग संस्थेचे संस्थापक व संचालक डॉ. रोहित माधव साने, मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. गुरुदत्त अमीन, पेशंट एंगेजमेंट हेड डॉ. सुहास डावखर आणि रिसर्च अॅन्ड डेव्हलपमेंट हेड डॉ. राहुल मांडोळे यांनी सन 2018 मध्ये टाईप 2 डायबेटीस रुग्णांच्या जीवनशैलीवर
संशोधन सुरु केलं. आयुर्वेदा अँड डाएटरी मॉडिफिकेशन फॉर टाईप 2 डायबेटीस मॅनेजमेंट हे त्या संशोधनांचं नाव टाईप 2 डायबेटीस रुग्णांच्या जीवनशैली विषयीचा अभ्यास किंवा ते संशोधन असं होत की, तीन महिने डाएट डायबेटीस रिव्हर्सल पंचकर्म ट्रिटमेंट घेऊन जे रुग्ण GIT टेस्ट (ग्लुकोज टोलरन्स टेस्ट ) पास झाले होते म्हणजेच 75 ग्रॅम साखर खाऊनसुद्धा ज्यांची शुगर नॉर्मल आली होती म्हणजेच या रुग्णांमध्ये रक्तातील साखर पचवण्याची क्षमता सामान्य, नॉन डायबेटीक लोकांप्रमाणे झाली होती अशा रुग्णांना वर्षभर डायबेटीसची कोणतीही अॅलोपॅथी औषधं न देता डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली ठेवण्यात आले.

त्यानंतर पुन्हा एका वर्षाने त्यांची जिटीटी टेस्ट ( ग्लुकोज टॉलरन्स टेस्ट) करून तीन महिन्यांची एव्हरेज दाखवणारी गोल्ड स्टॅण्डर्ड HbA1c चाचणी करण्यात आली. या चाचणीत एक वर्षानंतर 92% रुग्णाची HbAle चाचणी नॉर्मल आली. एकंदरीत या निरीक्षणाचा निष्कर्ष पाहता 92% रुग्ण हे वर्षभर कोणतेही औषधं न घेऊनसुद्धा त्यांची शुगर ही नॉर्मल आली. म्हणजेच ते रुग्ण नॉन डायबेटीक झालेले आहेत हे यावरून दिसून येते. कारण त्यांच्यात 75 ग्रॅम शुगर खाऊन सुद्धा नॉर्मल, नॉन डायबेटीक लोकांप्रमाणे शुगर पाचवण्याची क्षमता निर्माण झाली आहे असे सिद्ध झाले. याचाच अर्थ एकदा डायबेटीस रिव्हर्स झाला की तो पुन्हा होत नाही हे या संशोधनाद्वारे समोर आले आणि याच संशोधनाला JAPI (जर्नल ऑफ असोसिएशन ऑफ फिजिशियन्स ऑफ इंडिया) ची मान्यता प्राप्त झाली. सप्टेंबर 2002 मध्ये माधवबागचा आयुर्वेदा अँड डाएटरी मॉडिफिकेशन फॉर टाईप 2 डायबेटीस मॅनेजमेंट हा रिसर्च पेपर JAPI च्या संशोधन प्रबंधामध्ये प्रकाशित झाला. याचाच अर्थ भारताला सापासारखा विळखा घालून बसलेल्या या टाईप 2 डायबेटिस रिव्हर्स करण्याची त्याला परतवून लावण्याची ताकत आयुर्वेदामध्ये आहे हे या संशोधनातून सिद्ध झाल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आलं! यावेळी माधवबाग चंद्रपूर चे डायबेटिस Reversal Expert डॉक्टर प्रीती सरबेरे व डॉक्टर लक्ष्मीनारायण सरबेरे यांनी चंद्रपूर मध्येही भरपूर Diabetes रुग्णांनी जीवनशैली बदलवून आपला Diabetes Reverse करून घेतलेले आहे याविषयी माहिती दिली. माधवबागच्या संपूर्ण टीमकडून डायबेटीस रुग्णांना आव्हानही करण्यात आले की, टाईप 2 डायबेटीस हा पूर्णपणे रिव्हर्स होऊ शकतो फक्त गरज आहे ती योग्य उपचारांची संपूर्ण महाराष्ट्रात माधवबागची 200 हून अधिक क्लिनिक्स रुग्ण सेवेसाठी सदैव तत्पर आहेत चन्द्रपूरमध्ये जटपुरा आणि तूकुम या ठिकाणी क्लिनिक्स आहेत.

दिनचर्या न्युज