बाराबलुतेदार महासंघ ची बैठक राष्ट्रीय अध्यक्ष श्री. कल्याणजी दळे यांचे मुंबईत येण्याचे आवाहन!






बाराबलुतेदार महासंघ ची बैठक राष्ट्रीय अध्यक्ष श्री. कल्याणजी दळे यांचे मुंबईत येण्याचे आवाहन!


दिनचर्या न्युज
नागपूर :-
दि .16 रोजी नागपूर येथे बाराबलुतेदार महासंघाची बैठक सम्पन्न झाली. या बैठकीत बाराबलुतेदार समाजाचे अनेक प्रतिनिधी मोठया संख्येने उपस्थित होते. तर मंचावर प्रदेश संपर्क प्रमूख मा. डी.डी.सोनटक्के ,प्रदेश संघटक मा.शंकरराव चुरागडे प्रामुख्याने उपस्थित होते.
बाराबलुतेदार समाज कशा प्रकारे मागे पडलेला असून याकडे राजकीय पक्ष आणि सरकार चे कसे दुर्लक्ष होत आहे यावर विशेष प्रकाश टाकण्यात आला. जोपर्यंत अल्पसंख्यांक बाराबलुतेदार समाज विखूरलेला राहील आणि त्याची एकजूट वज्रमूठ तैयार होत नाहीं. या सम्पूर्ण समाजाकडे सरकार आणि राजकीय पक्षाचे दुर्लक्षच असणार आहे. बाराबलुतेदार समाजामध्य अनेक जातींचा समावेश आहेत पण प्रत्येक जाती ही आपापल्या परीने आपल्या सामाजिक समस्या करिता संघर्ष करीत आहे पण त्यांना आजपर्यंत कोणत्याही सरकारी सुविधा अथवा सहायता झाली नाहीं. त्यांच्या कोणत्याही समस्या कडे सरकार ने डोकावून बघितले नाहीं. यावर विचार्मथन होऊन आज नागपूर जिल्ह्यातील सम्पूर्ण बाराबलुतेदार समाज प्रतिनिधी एकजूट होऊन ही बैठक घेण्यात आली आणि अनेक समाजाचे प्रतिनिधी नी आपले भाव व विचार प्रगट केले आणि समाज एकता करून सरकार चे लक्ष केंद्रित व्हावे याकरिता बाराबलुतेदार महासंघ चे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. कल्याणराव दळे साहेब यांनी येणाऱ्या दोन तारखेला मुंबईला एकत्र होण्याचे आव्हान केले आणि सत्ताधारी सरकार चे मंत्री श्री वडेट्टीवार श्रम व बहुजन कल्याण व आपत्ती, मदत व पुनर्वसन मंत्री यांना बाराबलुतेदार संघाच्या समस्या जाणून घेण्यासाठी आमंत्रित केले आहे व ते तिथे येण्याचे आश्वासन मिळाले आहे. म्हणून मा. दळे साहेबांनी सर्वांच्या समस्या व सुविधा जाणून घेतल्या आणि शासन दरबारी समस्या मांडून घेण्यासाठी मा.मंत्री वडेट्टीवार साहेबाना बोलावले आहे. मा. दळे साहेबांनी असा विश्वास प्रगट केला की बाराबलुतेदार महासंघाच्या वज्र मुठीसमोर निषश्चित समाजासाठी काही घोषणा होणार जी समजविकास आणि संघटन मजबुती करिता संजीवनी ठरणार आहे. करिता अधिकाधिक संख्येने उपस्थित राहण्याचे आव्हवान केले आहे. आणि बैठकीत मान्यवरांचे मार्गदर्शन लाभले ज्यामुळे महासंघाचे प्रतिनिधी व कार्यकर्ता उत्साही झालेत ज्याचाच परिणाम की नागपूर जिल्हा कार्यकारिणी घोषित करण्यात आली ज्यामध्ये पाच बांधवाना पदनियुक्ती देण्यात आली त्यात प्रामुख्याने श्री. धनराज वलोकर यांना जिल्हा अध्यक्ष, श्री. अरुण नागपुरे कार्यध्यक्ष,श्री. पुरषोत्तम लोखंडे उपाध्यक्ष, श्री. चंद्रशेखर खोपे महासचिव, श्री. नरेश क्षीरसागर मुख्य संघटक घोषित करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी या कार्यक्रमास यशस्वी करण्याकरिता बाराबलुतेदार मध्ये येत असलेल्या सर्व सदस्य यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे संचालन राजेश खांडेकर यांनी केले तर प्रस्तावना शंकरराव चूरागडे यांनी तर चंद्रशेखर खोपे यांनी आभार मानले. या कार्यक्रमाला नाभिक एकता मंच,धोबी समाज,गुरव समाज,कूंभार समाज,कोष्टी, शिंपी ,लोहार समाज या अनेक संघटना चे हे प्रतिनिधी उपस्थित होते.

दिनचर्या न्युज