15 वित्त आयोगातून मंजूर झालेल्या विविध कामांचा भूमिपूजन सोहळा.





15 वित्त आयोगातून मंजूर झालेल्या विविध कामांचा
भूमिपूजन सोहळा.

दिनचर्या न्युज
चंद्रपूर :-
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पंचायत समिती सदस्य मा. पंकजजी ढेंगारे यांच्या प्रयत्नाने १५ व्या वित्त आयोगातून मंजुर झालेल्या विविध कामांचा भूमिपूजन सोहळा ग्रामपंचायत विचोडा(रै) येतील येत असलेल्या खैरगाव - चांदसूर्ला या गावात पार पडला. गावाचा विकास व्हावा या हेतूने श्री पंकज ढेंगारे यांनी निधी खेचून आणला याबद्दल संपूर्ण गावकऱ्यांनी पंचायत समिती सदस्य पंकज ढेंगारे यांचे जाहीर आभार मानले.



याप्रसंगी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर, चंद्रपूर पंचायत समिती च्या सभापती सौ. केमाताई रायपुरे, सरपंच सौ. सागोरे ताई, उपसरपंच श्री अनिलजी डोंगरे, ग्रामपंचायत सदस्य श्री अंकितजी ढेंगारे, उर्जानगर ग्रामपंचायत सदस्य श्री अनुकूल खंनाडे, श्री. शुभम आंबोदकर, राष्ट्रवादी कामगार सेलचे उपाध्यक्ष श्री संजय सेजुळ, रा. यु. काँ. जिल्हा सरचिटणीस श्री संदीप बिसेन, श्री. सौरभ घोरपडे, अभिलाष ढेंगारे, ग्रामपंचायत सचिव तसेच गावातील जेष्ठ नागरिक उपस्थित होते.