बाळापुर (बुज.) येथे विविध विकासकामांचे आम.बंटीभाऊ भांगडिया यांच्या हस्ते लोकार्पण ..
जि.प.सदस्य संजय गजपुरे यांचा पाठपुरावा...
दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
पारडी - मिंडाळा - बाळापुर क्षेत्राचे जिल्हा परिषद सदस्य व भाजपा जिल्हा संघटन महामंत्री संजय गजपुरे यांच्या पाठपुराव्याने बाळापुर ( बुज.) येथे मंजुर झालेल्या विविध विकासकामांचे लोकार्पण चिमुर - नागभीड विधानसभेचे आमदार बंटीभाऊ भांगडिया यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले . यावेळी जि.प.सदस्य संजय गजपुरे व पं.स.सदस्य संतोष रडके यांची प्रमुख उपस्थिती होती.
जिल्हा निधीतुन करण्यात आलेल्या बाळापुर (बुज.) येथील पशुवैद्यकीय दवाखान्याचे विस्तारीकरण व संरक्षण भिंत , प्राथमिक आरोग्य केंद्राच्या निवासस्थानाचे नुतनीकरण व परिसरातील जागेत पेव्हर ब्लॉक बांधकाम यासोबतच जि.प.समाजकल्याण निधीतून प्रा.रमेश रामटेके यांच्या घराजवळील बौध्दविहार परीसर सौंदर्यीकरणाचे लोकार्पण याप्रसंगी करण्यात आले . संजय गजपुरे यांनी जिल्हा परिषद क्षेत्रातील प्रत्येक गावात विविध निधींच्या माध्यमातून कोट्यावधी रुपयांची विकासकामे आपल्या कार्यकाळात पुर्णत्वास नेली असुन यासाठी त्यांनी माजी पालकमंत्री आम.सुधीरभाऊ मुनगंटीवार , खासदार अशोकभाऊ नेते , आमदार बंटीभाऊ भांगडिया , विधानपरिषद सदस्य आमदार डॉ. रामदासजी आंबटकर , जिल्हा परिषद अध्यक्षा सौ.संध्याताई गुरनुले , जिल्हा परिषद चे माजी अध्यक्ष देवराव भोंगळे तसेच जिल्हा परिषदेचे सर्व आजी व माजी सभापती यांच्या सहकार्याबद्दल आभार मानले आहे.
याप्रसंगी बाळापुर चे वैद्यकीय अधिकारी डॉ. हिवरकर , कृ.उ.बा. समिती सभापती आवेश पठाण, नागभीड न.प.उपाध्यक्ष गणेश तर्वेकर, बांधकाम सभापती न.प. नागभीड सचिन आकुलवार, माजी जि.प.सभापती ईश्वर मेश्राम, ग्रा.पं. बाळापूर (बूज) चे सरपंच प्रशांत कामडी, उपसरपंच सौ. पुष्पमाला जनबंधु , जि.प. सर्कल प्रमुख धनराज बावनकर,कृऊबास संचालक धनराज ढोक व विलास मोहुर्ले , राजुभाऊ गुरपुडे, नितेश कुर्झेकर , बुथ प्रमुख मनोहर चेल्लीरवार , बाळापुर (बुज.) ग्रा.पं.चे सदस्य सौ.करिष्मा बावणे , सौ.आम्रपाली कसारे , सौ.शिल्पा ऊईके , शैलेश मोहुर्ले , विनोद जनबंधु व इतर भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.
दिनचर्या न्युज