मूल येथे शरदचंद्रजी पवार साहेब ह्यांच्या वाढदिवसानिमित्य लाईव्ह वर्चुअल रॅली चे आयोजन chandrapur

मूल येथे शरदचंद्रजी पवार साहेब ह्यांच्या वाढदिवसानिमित्य लाईव्ह वर्चुअल रॅली चे आयोजन*

दिनचर्या न्युज
चंद्रपूर :-
दिनांक १२-१२-२०२१ रोज रविवारला सकाळी ९.०० वाजता  रामलीला भवन मूल येथे लाईव्ह थेट प्रक्षेपण राष्ट्रवादी काँग्रेस चे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्रजी पवार साहेबांचा वाढदिवस निमित्य १०*८ च्या एल.ई .डी वरती कार्यक्रमातील अनेक राष्ट्रवादी काँग्रेस चे दिग्गज नेत्यांचे मार्गदर्शन व पक्षातील नवनवीन उपक्रम उपस्थितितांना दाखविण्यात आले ! 
       कार्यक्रमापूर्वी कार्यक्रमाची सुरुवात म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस चे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य, महिला जिल्हा अध्यक्ष बेबीताई उईके , बल्लारपूर विधानसभा  क्षेत्र अध्यक्ष सुमीत सुरेशराव समर्थ , जेष्ठ नेते महादेवराव पिदूरकर साहेब , डाँ. अडबाले ह्यांच्या हस्ते  महामानवांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून दीपप्रज्वलण चा कार्यक्रम करण्यात आला ! 
          शरदचंद्रजी पवार साहेब ह्यांच्या वाढदिवसानिमित्य केक सुद्धा कापण्यात आला !
सदर कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांच्या उपस्थित अनेकांनी पक्ष प्रवेश सुद्धा केला ! 
     सदर पक्ष प्रवेशाच्या कार्यक्रमात , भाग्यश्रीताई तागडे, युनूस शेख , फारूख शेख, शानु खान, शानु शेख , पवन गुरनुले, अश्विन खोब्रागडे, वैभव चिताडे,सोहन न्हाने ,  ह्याप्रकारे अनेकांनी आपआपल्या कार्यकर्त्यांसह पक्ष प्रवेश केला !
          कार्यक्रम अतिशय शांत शिस्त पद्धधतीने पार पडला !
       कार्यक्रमाची समाप्ती राष्ट्रगीतेने पार पडली !
         कार्यक्रमाचे आयोजन बल्लारपूर विधानसभा क्षेत्र अध्यक्ष सुमीत समर्थ ह्यांनी केले !
      सदर कार्यक्रम  यशस्वी होण्याकरिता राष्ट्रवादी काँग्रेस चे तालुकाध्यक्ष किसनराव वासाडे , शहर अध्यक्ष भास्कर खोब्रागडे, महिला तालुकाध्यक्ष निताताई गेडाम, शहर कार्याध्यक्ष महेश जेंगठे ,युवक तालुका अध्यक्ष समीर अल्लूरवार, हेमंत सुपणार, प्रभाकर धोटे, विपुल ठिकरे, अजय त्रिपट्टीवार, साईनाथ गुंडोजवार, संदीप तेलंग, धम्मपाल घडसे, मारोती रोहिने, नितेश म्याकलवार, इंद्रापाल पुणेकर, सुमीत लाकडे ह्यांनी कार्यक्रम यशस्वी होण्याकरिता कथक परिश्रम केले !

दिनचर्या न्युज