राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना आज पासून बेमुदत संपावर !
दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
राज्यातील युती शासनाचा कारभार स्वीकारून 13 महिन्यात उलटले असताना सुद्धा, आता पर्यंत राज्य सरकारी, कर्मचारी व मध्यवर्ती संघटना, सरकारी व निमसरकारी, शिक्षक, शिक्षेतकर कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यासाठी आत्तापर्यंत सरकारला लोकशाही पद्धतीने आंदोलन करून सुद्धा कुठल्याही प्रकारच्या समस्याचे निराकरण झाले नाही. सरकार सर्वच मागण्याबाबत शासन दुर्लक्षित करत असल्याचे वास्तव समोर आहे. यामुळे सर्व महाराष्ट्रातील कर्मचारी, शिक्षकांच्या मनात सरकार बद्दल असंतोष घुसमत आहे. सरकार विरोधात नाराज राज्यातील कर्मचारी, शिक्षक मंगळवार दिनांक 21 एप्रिल 2026 पासून राज्यभर बेमुदत संप पुकारला आहे. पुढे राज्यातील सर्व राज्य सरकारी कर्मचारी , मध्यवर्ती संघटना,शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी यांनी संपाच्या दिवशी कोणीही कार्यालयात, न जाण्याचा निर्णय घेतला आहे. आपल्या न्याय मागण्या हक्कासाठी राज्यव्यापी बेमुदत संपात चंद्रपूर जिल्ह्यातील सर्वच कर्मचारी- शिक्षकांनी संपात सहभाग दर्शविला असून आता बेमुदत संप पुकारण्यात आला आहे. यामुळे प्रशासनाच्या कार्य कारभारावर फार मोठा फटका बसत आहे. कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना आल्या पावली परत जावे लागत असल्याने सर्वसामान्याचे फार मोठे नुकसान होत आहे.
या मोर्चात प्रत्येक संघटनाचे बॅनर बाजी आढळून आली. सरकार विरोधात नारेबाजी ही करण्यात आली. यावेळी संघटनेचे अध्यक्ष अशोक दगडे यांच्या मार्गदर्शनाखाली जेऊरकर दीपक जेऊरकर, राजू धांडे, संतोष अतकरे, उमेश चिलबुले, अविनाश बोरगमवार , अतुल किनेकर, लीना जांभुळकर, शैलेश धात्रक, सीमा पाल, चंद्रकांत कोतपल्लीवार, यास शेकडो राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना महाराष्ट्र जिल्हा शाखा चंद्रपूर यांची उपस्थिती होती.
