मुठभर राजकीय लोक मूल वासियांचा जीव धोक्यात टाकू पाहत आहेत-नगराध्यक्ष एकता समर्थ शोभाताई फडणवीस मुख्यमंत्र्यांची दिशाभूल करत आहेत मूल शहरातील प्रस्तावित माल धक्क्यास जनतेचा तीव्र विरोध




मुठभर राजकीय लोक मूल वासियांचा जीव धोक्यात टाकू पाहत आहेत-नगराध्यक्ष एकता समर्थ

शोभाताई फडणवीस मुख्यमंत्र्यांची दिशाभूल करत आहेत

मूल शहरातील प्रस्तावित माल धक्क्यास जनतेचा तीव्र विरोध


दिनचर्या न्युज :-
मूल, चंद्रपूर, दि. २४/४/२०२६

मूल शहर हे पर्यावरणीय दृष्टिकोनातून एक शांत व सुंदर शहर आहे. या शहराच्या अवघ्या पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या केळझर या गावात पूर्वीपासूनच माल धक्का आहे. त्यामुळे पुन्हा मुल या शहरांमध्ये नव्याने माल धक्का सुरू केल्यास येथे प्रदूषणात वाढ आणि अपघाताच्या संख्येत वाढ होईल. म्हणून मूल वासियांचा या माल धक्क्यास तीव्र विरोध आहे.अशी माहिती माल धक्का हटाव संघर्ष समिती द्वारा आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली.
स्थानिक एन.डी. हॉटेल येथे आयोजित या पत्रकार परिषदेला मूल नगर परिषदेच्या नगराध्यक्ष एकता समर्थ सभापती प्रशांत समर्थ आणि मूल शहरातील उद्योग, शिक्षण, व्यवसाय, सामाजिक व राजकीय अशा विविध क्षेत्रातील विविध मान्यवर उपस्थित होते.
सन 2023 मध्ये सुरजागड येथील लोह खनिजाची वाहतूक चांदा फोर्ट गोंदिया रेल्वे मार्गावरून करण्यासाठी मूल शहरात माल धक्का प्रस्तावित करण्यात आला होता.
मात्र त्यावेळी आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी विरोध करून यामाल धक्क्याला केळझर येथे स्थानातील केले.
यासाठी रेल्वे विभागाने कामही सुरू केले होते. परंतु या प्रकल्पामुळे शहराच्या मध्यातून मोठ्या प्रमाणात हायवा ट्रक वाहतूक होणार असल्याने वाहतूक कोंडी, अपघातांचा धोका व प्रदूषणाची मोठी समस्या निर्माण होण्याची भीती निर्माण झाली होती. तसेच शहरातील एकमेव कर्मवीर महाविद्यालयाचे मोठे मैदान नष्ट होण्याची शक्यता होती. या विरोधात मूलमध्ये 5000 हून अधिक विद्यार्थी, व्यापारी, नागरिकांनी, सर्व राजकीय पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी एकत्र येत मोर्चा काढून या प्रस्तावित मालधक्क्याला विरोध केला होता. त्यावेळी रेल्वे विभागाने मूल शहरापासून अवघ्या पाच किलोमीटर अंतरावर असल्यास केळझर येथे याच रेल्वे मार्गावर नवा माल धक्का सुरू केला. सध्या याच मार्गाने या लोह खनिजाची वाहतूक सुरू आहे. त्यामुळे मूल शहरात नव्याने वेगळ्या मालकाची कोणतीही आवश्यकता नाही. अशी ठाम भूमिका मूलवासीयांनी घेतली आहे. या संदर्भात मूल नगर परिषदेने विशेष सभेचे आयोजन करून सर्वानुमते एक ठराव घेऊन मुल शहरात प्रदूषणाची वाढ होऊ नये, अपघातांची वाढ होऊ नये व शहराचे सौंदर्य अबाधित राहावे यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिले आहे.
         याठिकाणी माल धक्का व्हावा अशी या शहरातील काही मुठभर राजकीय लोकांची इच्छा आहे. ते मूल वासीयांचा जीव धोक्यात  टाकू पाहत आहेत.
 त्यात त्यांचे काही हितसंबंध गुंतले आहेत का? याची आम्हाला जाणीव नाही. परंतु शहरातील या मूठभर राजकीय लोकांचे हितसंबंध पूर्ण व्हावे यासाठी त्यांनी आखलेला हा डाव आम्ही यशस्वी होऊ देणार नाही अशी भूमिका मुल नगर परिषदेच्या नगराध्यक्ष एकता समर्थ यांनी या पत्रकार परिषदेमध्ये व्यक्त केली. 

बॉक्स :--- 
शोभाताई फडणवीस मुख्यमंत्र्यांची दिशाभूल करत आहेत 

मूल विधानसभा क्षेत्राच्या पाच वेळा आमदार राहिलेल्या आणि मंत्री राहिलेल्या भाजपाच्या ज्येष्ठ नेत्या शोभाताई फडणवीस यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना 25000 विद्यार्थ्यांचे निवेदन देऊन मूल शहरात माल धक्का सुरू करण्याची मागणी केली आहे. ही मागणी मुख्यमंत्री महोदयांना चुकीची आणि दिशाभूल करणारी माहिती देऊन करण्यात आली आहे. यापूर्वी वाघाच्या किंवा इतर काही तत्सम निवेदनावर घेण्यात आलेल्या स्वाक्षऱ्या चा गैरवापर करून हे निवेदन शोभाताई फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेले आहे. असा आरोप माल धक्का हटाव संघर्ष समिती द्वारे करण्यात आला आहे. 
 वर्तमानपत्रांमधून अशी माहिती समोर आली आहे की माजी मंत्री शोभाताई फडणवीस यांनी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना २५,००० विद्यार्थ्यांचे निवेदन देऊन मूल शहरात मालधक्का सुरू करण्याची मागणी केली आहे. ही मागणी मुख्यमंत्री महोदयांना चुकीची आणि दिशाभूल करणारी माहिती देऊन करण्यात आली आहे.
मूल शहरात मालधक्का होऊ नये, तसेच शहर पर्यावरणीय व अपघाताच्या दृष्टीने सुरक्षित राहावे, यासाठी तालुक्यातील जनता ठामपणे आग्रही आहे. चंद्रपूर जिल्हा वाघांचा जिल्हा आहे या कारणावरून मूल शहरात मालधक्का सुरू करण्याची मागणी करणे ही पूर्णपणे तर्कहीन भूमिका असून, या मागणीस आमचा स्पष्ट विरोध आहे. मुळात शोभाताई फडणवीस व पांडुरंगजी आंबटकर यांनी कोणत्याही विद्यार्थ्यांच्या सह्या न घेता, ग्रामीण भागातील नागरिकांकडून वाघांच्या हल्ल्यांवर बंदोबस्त करण्याच्या मागणीसाठी घेतलेल्या सह्यांचा वापर या मालधक्का मागणीसाठी केला आहे. ही बाब मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची दिशाभूल करणारी असून अत्यंत गंभीर आहे.
असा आरोप माल धक्का हटाव संघर्ष समिती द्वारे करण्यात आला आहे. 
तद्वतच मुल आणि आजूबाजूचा परिसर हा कृषी आधारित पट्टा असल्यामुळे या ठिकाणी येणारे उद्योग हे कृषी व्यवसायाला पूरक असे उद्योग असावेत अशी मागणीही यावेळी करण्यात आली.