वाहतूक विभागातून विष्णूची माया संपता संपेना!
दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर:-
जिल्ह्यातील पोलीस खात्यातील महत्त्वाचा विभाग समजला जाणाऱ्या विभागांपैकी एक विभाग म्हणजे वाहतूक शाखा होय. या शाखेतील वाहतूक पोलीस
यांना जिल्ह्यातील शहरांमधील सुव्यवस्था, बंदोबस्त , तसेच शहरातील टप्प्याटप्प्यावर वाहतुकीस अडथळा न व्हावा यासाठी वाहतूक पोलिसांची नेमणूक केली असते. मात्र चंद्रपूर वाहतूक पोलीस शाखेच्या विभागाचे वेगळेच आहे. टप्प्यावर असलेल्या पोलिसांना रोज चालानचे टार्गेट दिले जाते. ते टारगेट वाहतूक पोलिसांकडून पूर्ण न झाल्यास त्यांना उद्धट भाषेत अधिकाऱ्यांकडून सुनावल्या जाते. येथील विष्णूसह गेडाम नावाचा हवालदारही
वाहतूक शाखेची मोहमाया जमवण्यात व्यस्त असल्याची कुजबुज आहे. या जमवलेल्या मोह मायात वरिष्ठ अधिकाऱ्यांसह, वाहतुक पोलीस निरीक्षक, वाहतूक पोलीस यांचा काही पर्सेंटवर वाटा घाटी होत असल्याचे बोले जात आहे.
वाहतूक शाखेतील तीन ते पाच वर्ष झालेल्या अनेक पोलीस हवालदारांच्या बदल्या झाल्या मात्र येतील विष्णू नावाच्या पोलीस हवालदाराची पाच वर्षापासून वाहतूक विभागातून मोहमाया संमता संपेना! या पोलिसांची बदली ही शहर पोलीस ठाण्यात झाली असून मात्र तो आजही वाहतूक पोलीस शाखेतच आहे. या पोलीस हवालदारावर कोणाची माया आहे, की तो या शाखेत असून या विभागात अर्थ कारणासह रात्री-बेरात्री गस्तीच्या वाहनाने रात्री चालणाऱ्या वाहनासह ग्रामीण भागातील रेतीवर चालणाऱ्या गाड्या हे यांचे भक्ष्य
असून रेतीवाल्याकडून वसूली करीत असल्याची माहिती नाव न सांगण्याच्या अटीवर माध्यमप्रतिनीधीला सांगीतले.
नेहमी वाहतूक विभागाची एक गाडीही महामार्गावर गस्तीवर असल्याची बाब समोर येत आहे . हे वाहतूक शाखेचे वाहन महामार्गावरील मूल मार्ग, ब्रह्मपुरी नागभीड, बल्लारपूर मार्गावरील राजुरा, बामणी या मार्गावर नेहमीच वाहतूक विभागाची गाडीही वसुलीसाठी उभी असल्याची नागरीकात चर्चा होतआहे.
खरेतर उपप्रादेशिक विभागाच्या अधिकाऱ्यांनी, तसेच महामार्गावरील अधिकाऱ्यांची ही जबाबदारी असते. की महामार्गावर चालणाऱ्या वाहनावर नियंत्रण ठेवणे, किंवा महामार्गावर होत असलेल्या अपघाताची माहिती होताच त्या घटनास्थळी पोहोचवण्याची जबाबदारी आरटीओ, महामार्गपोलिसांची असते. मात्र जिल्ह्यातील वाहतूक शाखेतील पोलीस अधिकारी वसुलीच्या नावाने महामार्गावर जनतेची सर्रास लूट करीत असल्याची माहीती नागरीकासह प्रसारमाध्यमात आहे. या वाहतूक शाखेच्या वसुली बहादारावर वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी गांभीर्याने घेऊन कारवाई करावी ही नागरिकांची मागणी होत आहे.