गडचांदूरातील पो. शकिला निवृत्तीला एक महिना बाकी ! मात्र, रजेवर असतानाही करतो वसुली ?






गडचांदूरातील पो. शकिला निवृत्तीला एक महिना बाकी ! मात्र, रजेवर असतानाही करतो वसुली ?

गडचांदूरात पोलिस अधिकारी शकील यांची ट्रान्सपोर्ट कडून सुट्टीवर असतांनाच ही वसुली सुरू?

निवृत्तीला एक महिन्याच्या कालावधी!
पोलीस निरीक्षक आमले यांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष!

दिनचर्या न्युज :-
गडचांदूर (प्रति.) : कोरपना तालुक्यातील गडचांदूर पोलीस स्टेशन नेहमी विविध कारणाने चर्चेचा विषय राहिली आहे. सत्यजित आमले नावाचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक येथे मागील काही महिन्यापासून कार्यरत आहे. यापूर्वी......... यांच्या कार्यकाळात हा गडचांदूर मध्ये नेहमी वादग्रस्त राहिला आहे. शकील नावाचे वसुली अधिकारी मागील पंधरा वर्षापासून या ठिकाणी कार्यरत असल्याची धक्कादायक माहिती मिळाली. निवृत्तीच्या जवळ असलेले शकील हे मागील काही दिवसापासून सुट्टीवर आहेत. त्यानंतर त्यांची निवृत्तीही एक महिन्यात होणार अशी अधिकृत माहिती मिळाली आहे. परंतु आजही सुट्टीवर असतांनही गडचांदूर मधून अवैध धंदेवाले, ट्रान्सपोर्ट धारकांकडून पोलीस विभागासाठी वसुली करण्याचे काम शकील करीत आहे. अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. वैद्यकीय रजेवर असलेले शकील रजेवर असतांना वसुली कशी काय करत आहे? हा संशोधनाचा विषय आहे याकडे चंद्रपुर चे पोलिस अधीक्षक व गडचांदूर पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलिस निरिक्षक सत्यजित आमले यांनी अवश्य लक्ष घालावे, अशी मागणी गडचांदूर परिसरातील ट्रांसपोर्ट धारकांकडून होऊन राहिली आहे. राज्यांमध्ये परमजीत सिंग यांच्या प्रकरणानंतर महाराष्ट्र पोलिसांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागले. पोलिसांची अवैध वसुली हा आता चर्चेचा नाहीतर चिंतेचा विषय झाला आहे. गडचांदूर परिसरात सुरु असलेली शकील यांच्याकडून यांच्याकडील वसुली याची वरिष्ठ स्तरावर चौकशी होणे गरजेचे आहे. मिळालेल्या माहितीनुसार शकील हा मागील पंधरा वर्षापासून गडचांदूर येथे कार्यरत असून त्यांची बदली ही अन्य ठिकाणी झाल्यानंतरही काही दिवसांमध्ये ते पुन्हा गडचांदूर परिसरातच कार्यरत कसे होतात ? याना या परिसरातील खडा न खडा माहिती असून कुठेही शकल दाखवली की, काम आपोआप होत अशी चर्चा आता गडचांदूरात सुरू आहे.