विकृत वृत्तीच्या जावेद हबीबच्या विरोधात देशभरातील सलून व्यवसायिकांचा आज बहिष्कार दिवस


विकृत वृत्तीच्या जावेद हबीबच्या विरोधात देशभरातील सलून व्यवसायिकांचा आज बहिष्कार दिवस

*⚫जाहीर निषेध⚫जाहीर निषेध⚫*

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
मुर्ख हेयर स्टायलीश्ट जावेद हबीबच्या विकृत मनोवृत्तीचे दर्शन सोशल मीडियाद्वारे साऱ्या जगाला घडले.जावेद हबीब एका शिबिरामध्ये महिलेचे केश कापत असताना बिभस्तपने पाण्या ऐवजी केसात थुकताना दाखवले आहे.
सदर महिलेच्या तक्रारीवरून हा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल झाल्याने देशभरातील समस्त सलून आणि ब्युटी पार्लर व्यवसायिक संतापले आहेत.
सलून आणि पार्लर व्यवसायाला बदनाम करणाऱ्या विकृत मानसिकतेच्या जावेद हबीबच्या सर्व सलून कार्यशाळा आणि सेमिनारवर बंदी घालण्यासाठी सलून व्यवसायातील सर्व संघटना सेव्ह सलोन इंडियाच्या माध्यमातून एकवटल्या आहेत.
विकृत वृत्तीच्या जावेद हबीबला
येथून पुढे राज्यभर बंदी घालण्याचा निर्णय सेव्ह सलोन इंडियाच्या वतीने राज्यातील सर्व संघटनांनी घेतला आहे.
आज शनिवार दि.८ जानेवारी रोजी देशभर समस्त सलून आणि ब्युटी पार्लर संघटनांच्या वतीने या विकृत कृतीचा संताप व्यक्त करण्यासाठी सलून व्यवसायाच्या वतीने निषेध व्यक्त करून सर्वत्र बहिष्कार दिवस पाळण्यात येत आहे.
सलून व्यवसाय आजवर नेहमीच महिलांसह सर्वच ग्राहकांचा सन्मान करून सेवादानाचे कार्य वर्षानुवर्षे करीत आहे.
ज्या सलून व्यवसायाने जावेद हबीब सारख्या कलाकाराला एव्हढे मोठे करून मान,सन्मान आणि वैभव दिले,त्याच व्यवसायाला जावेद हबीबच्या विकृत मनोवृत्तीने ठेच पोहचली आहे.अशा मानसिक विकृती नेहमीच सलून व्यवसायाला हानिकारक असतात म्हणून
या विकृतीला वेळीच आळा घालण्यासाठी देशभरातील संतापलेल्या सलून व्यवसायिक आज जावेद हबीबच्या विरोधात बहिष्कार घालीत आहेत.
देश भरातील सलून आणि ब्युटी पार्लर व्यवसायिक आपआपल्या राज्यात या विकृत कृतीचा विरोध करण्यासाठी काळी पट्टी लाऊन बहिष्कार व्यक्त करीत आहे.
तसेच जावेद हबीबच्या सलून कार्यशाळा आणि सेमिनारवर देखील बंदी घालण्याची मागणी विविध संघटनांच्या वतीने सरकार कडे करण्यात येत आहे.

*⚫प्रत्येक सलून व्यवसायिकांनी आज आपल्या सलूनमधे अथवा पार्लर मधे काळी फित लावून बहिष्कार नोंदवून आपल्या एकतेचे दर्शन घडवावे ही विनंती*

*आमची एकता,हाच आमचा स्वाभिमान*

*✊ सलून एकता जिंदाबाद. ✊*
दिनचर्या न्युज