१९ वर्ष देशसेवा करून जयस आस्कर मायदेशी परतले, भिवापुर वार्डात जल्लोषात स्वागत !
१९ वर्ष देशसेवा करून जयस आस्कर मायदेशी परतले, भिवापुर वार्डात जल्लोषात स्वागत !

दिनचर्या न्युज :-

चंद्रपूर :-

चंद्रपूर येथील नवजवान जयस बंडू आस्कर 19 वर्षापूर्वी आर्मीत वाहाक या पदावर भरती झाला. त्याने देशाच्या सेवेसाठी एकोणीस वर्षे आर्मीत राहून विविध ठिकाणी आपली देशसेवा करीत दिनांक १/२/२०२२ ला स्वय मायदेशी परतले. सामान्य कुटुंबातील जयस हा देशसेवेसाठी आर्मी भरती झाला. परिस्थिती बेताची असतानासुद्धा त्याच्या पालकांनी देश सेवेसाठी सैन्यात पाठविले. त्याचा त्यांना फार अभिमान असून, आज आपला मुलगा वयाचे 19 वर्षदेशासाठीसेवा करून परत आल्याचा आनंद झाला असल्याचे त्यांनी सांगितले. जयसच्या स्वागतासाठी भिवापुर वार्डातील  नागरिकांनी वाजत गाजत मिरवणूक काढून  त्याचे जल्लोषात स्वागत केले. यावेळी वार्डातील माजीनगरसेवक राजाभाऊ पोतनवार, प्रमोद कावळे, विनायक तरारे, दीपक कट्कोजवार, कुमार पोतनवार, श्रीकांत यलपुलवार, प्रदिप दासलवार, गंगाधर मंगाणी, वॉर्डातील शेकडो नागरिकांनी फुलांचा वर्षाव करून जयेश यांचे आर्मीतून मायदेशी पडल्याचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.