पठाणपुरा बाहेर ईरई नदीवर अवैद्य रेती उपसा करताना मारोतीचा मृत्यू !



पठाणपुरा बाहेर ईरई नदीवर अवैद्य रेती उपसा करताना मारोतीचा मृत्यू !

दिनचर्या न्युज :-

चंद्रपूर :-पठाणपुरा बाहेर टेकडीच्या मागील बाजूला ईरई नदी वाहत असते. या नदीमध्ये रेती तस्करांनी मागील कित्येक वर्षापासून रेती उपसण्याचा धुमाकूळ घातलेला आहे. या रेती तस्करान मुळे अनेकाचे जीवही या अगोदर गेले आहे. रेती उपसा केल्यामुळे नदीसह पर्यावरणाचाही नुस्कान होत आहे. वारंवार महसूल विभागाला याची माहिती देऊनही . या नदीकाठावरील रेती उपसा करणारे तस्कर अजूनही सक्रिय आहेत. अशातच आज दुपारच्या वेळेस बानकरच्या ट्रॅक्टरवर मारोती मडावी वय 40 नांदगांव   येथिल कामगारचा  रेती उपसा करताना नाहक बळी गेला.   पोलिसांनी पंचनामा करून  प्रेत ताब्यात घेतले .असून यासंदर्भात कारवाई सुद्धा  सुरू असून मारुतीचे प्रेत शासकीय दवाखान्यात पीएम साठी पाठवली असल्याची सूत्राकडून माहिती.  त्याच्या परिवाराला आर्थिक मदत देण्यात यावी. अशी मागणी त्यांच्या परिवाराकडून होत आहे.

या नदीघाटावर अनेक दिवसांपासून  पोकल्यान व जेसीबी द्वारे मोठ्या प्रमाणात रेतीचे   उत्खनन केले जात आहे. नदीपात्रात मोठमोठे खड्ड्यात निर्माण  झाले आहेत.  मात्र याकडे ना पोलीस प्रशासन लक्ष देत ?ना महसूल विभागाचे अधिकारी याकडे लक्ष देत.? पुन्हा किती बळी जाण्याची वाट पाहत आहेत .  हा  संशोधनाचा विषय आहे  ?