मा.ना.श्री.नवाब मलिक यांच्या अटकेचा चंद्रपूर जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसने निदर्शने करून केला जाहीर निषेध.




मा.ना.श्री.नवाब मलिक यांच्या अटकेचा चंद्रपूर जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसने निदर्शने करून केला जाहीर निषेध.

केंद्र सरकारच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी करून करण्यात आले आंदोलन.*

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :- राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते तथा राज्याचे कॅबिनेट मंत्री मा.ना.श्री. नवाब मलिक यांना आकसापोटी ईडीने अटक केली असल्याने सदर घटनेचा चंद्रपूर जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने आंदोलन करून निषेध व्यक्त करन्यात आला.

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी महात्मा गांधीजींच्या पुतळ्याला माल्यारपन करून मुख्य रस्त्यावर गांधीजींच्या पुतळ्या समोर केंद्र शासनाच्या ई.डी. व सी.बी.आय. च्या निषेधार्थ प्रचंड घोषणाबाजी करून आंदोलन केले.
भारतीय जनता पार्टी तथा केंद्र सरकार सरकारी यंत्रणेचा गैरवापर करीत आहे. ईडीचा दुरुपयोग करुन देशात चूकीचा पायंडा पाडत आहे. हे लोकशाहीसाठी घातक आहे. लोकशाही मार्गाने सत्तेवर आलेले महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी हा सर्व खटाटोप आहे. केंद्रातील भाजपा सरकार मनमानी कारभार व हुकूमशाही पध्दतीने, सूडबुध्दीने ईडीचा गैरवापर करीत आहे. केंद्राच्या अखत्यारीतील सरकारी यंत्रणांचा धाक दाखवून मंत्र्यांना व महाविकास आघाडीच्या नेत्यांना त्रास देण्याचे काम सुरू आहे.

या सर्व गोष्टींचा चंद्रपूर जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेस निषेध करीत असून केंद्र शासनाची ही हुकूमशाही खपवून घेतली जाणार नाही. हे असेच चालू राहिले तर यापेक्षा तीव्र स्वरुपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर यांनी दिला आला आहे.

           सदर आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे चंद्रपूर विधानसभा अध्यक्ष श्री सुनील भाऊ काळे, निमेश मानकर सर, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या अध्यक्षा सौ. शालिनीताई महाकुलकर, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुजित उपरे पंचायत समिती सदस्य पंकज धेंगारे, दुर्गापूर ग्रामपंचायतीचे मा. सरपंच अमोल ठाकरे, शहर कार्याध्यक्ष चारुशीलाताई बारसागडे, अल्पसंख्यांक सेलचे शहराध्यक्ष नौशाद सिद्दिकी, राष्ट्रवादी कामगार सेलचे जिल्हा उपाध्यक्ष संजय शेजुळ, विशाल चहारे, रायुका जिल्हा उपाध्यक्ष रोशन फुलझेले, तिमोति  बंडावार, कुमार पॉल, संभाजी खेवले, देवा धामनगे, किसन झाडे, शालीक भोयर, नम्रताताई रायपुरे, आकाश निरठवार, अभिनव देशपांडे, केतन जोरगेवर, राहुल देवतळे, पंकज मेंढे, सिहाल नगराळे, अंकित धेंगारे, अनुकूल खन्नाडे, पवन मेश्राम, बंटी मेश्राम, सौरभ घोरपडे, शुभम आंबोडवार, मनोज सोनी, पवन मेश्राम, संजय रामटेके यांचेसह राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.