नेत्यांचा अजब प्रोटोकॉल मध्ये बगीचा 'आझाद ' !




नेत्यांचा अजब प्रोटोकॉल मध्ये बगीचा 'आझाद ' !

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
चंद्रपूर शहराच्या मध्यभागी असलेल्या ऐतिहासिक मौलाना अब्दुल कलाम आझाद बगीच्याचे चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या वतीने लोकार्पण सोहळ्याचे गेम आयोजन करण्यात आले होते. मात्र दोन दिवसापासून या लोकार्पण सोहळ्यात प्रोटॉकल साठी राजकीय अस्तित्वाची लढाई सुरू झाली होती.
चंद्रपूर जिल्हा म्हणजे आदिवासी जिल्हा, सर्व सुविधायुक्त, विज,कोळसा , वन, सिमेंट यासह पेपर व लोह उत्पादक जिल्ह्यासह ताडोबा व्याघ्र प्रकल्प म्हणून जगप्रसिद्ध असलेला जिल्हा म्हणून ओळखला जातो. पण हया जिल्ह्यात कन्नमवार, बाबुराव मडावी, शांताराम पोटदुखे यांच्यानंतर कुणी चंद्रपूरच्या राजकारणात नाव कमावले असेल तर केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहिर, सुधीर मुनगंटीवार, विजय वेड्डट्टीवार, बाळूभाऊ धानोरकर व अपक्ष आमदार म्हणून निवडून आलेले किशोर जोरगेवार ज्यांनी स्वतःची पत राज्य नव्हे तर केंद्रीय स्तरावर पोहोचविली आहे . पण चंद्रपूर विधानसभा आज किशोर जोरगेवार यांना चंद्रपूर मतदारांनी बहाल केली असताना प्रत्येक आमदार, खासदार असलेल्या व्यक्तीला इथे आपला राजकीय वचबा असल्याचा प्रकार घडवून आणावा लागतो आहे. त्याचाच एक प्रमुख प्रकार म्हणजे चंद्रपूरचे गळ्यातील ताईत असलेले आझाद बगीचा उद्यान ज्याचा सौंदर्यीकरण लोकार्पण सोहळा आज दिनांक 26/03/2022 शनिवार रोज सायंकाळी पार पडणार होता. त्या सोहळ्यात चंद्रपूर जनतेला सर्व नेत्यांचा दळभद्री,किळस यावा असा प्रकार स्वतःच्या नयनांनी चंद्रपूरकरानी अनुभवायला .
जागोजागी चंद्रपूर शहरात "मी येणारच "म्हणून किशोर जोरगेवार यांचे फलक बघायला मिळाले म्हणून सत्यता तपासणी करण्यासाठी म्हणून चौकशी केली असता असे दिसले की, उद्घाटन सोहळ्या निमीत्त महानगर पालिका चंद्रपूर वतीने जी कार्यक्रमाची पहिलीपत्रिका प्रसारित करण्यात आली
काही बॅनर वर उद्घाटन चे वेळ यात तफावत दिसून आली. काही मध्ये त्यात चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार व खासदार  बाळूभाऊ धानोरकर यांचे नाव नव्हते. म्हणून सगळा नको तो राजकीय श्रेयवाद चव्हाट्यावर आला व जनतेला आज   पडलेला प्रकार आजाद बगीच्यात पाहायला मिळाला.
    चंद्रपूर महानगर पालिकेत व जिल्हा परीषद ईथे भाजपची सत्ता असल्याने व चंद्रपुरात भाजपचे सर्वेसर्वा म्हणून कार्यरत असलेले सुधीर मुनगंटीवार हे एक हाती सत्ता आपल्याच हाती असावी म्हणून सातत्याने कार्यरत असल्याने त्यांचा  चंद्रपूर जिल्ह्यात  मंत्री असताना क्षेत्रात केलेल्या कामाची पावती सुधीर भाऊची देन आहे यात दुमत नाही. पण,
  राजकीय अभ्यासाचे दाखले चंद्रपूर जनता अनुभवत आहे. पण वर्तमान परिस्थितीत लोकप्रतिनिधी या नात्याने, विजय वेड्डट्टीवार असो की धानोरकर किंवा किशोर जोरगेवार सर्वांसाठी चंद्रपूर महानगर पालिका फार महत्त्वाची आहे. म्हणून आझाद बगीचा उद्घाटन सोहळ्यात येणारी महानगर पालिकेची तोंडावरील निवडणुक बघता राजकीय कुटनीतीची मोर्चेबांधणी दिसून आली. व परिणामी सर्व पक्षीय नेते स्वतःचा गाजावाजा करण्यासाठी वाटेल ते षडयंत्र करायला ही मागे पूढे बघत नाही! यात चंद्रपूर जिल्ह्यातील  जनतेचे काय?
आज आझाद बागेचा घडलेला सर्व प्रकार चंद्रपूरच्या जनतेनी बघितला. सर्व जनता किशोर जोरगेवार यांच्यासोबत चंद्रपूरचे आमदार म्हणून निश्चित अन्याय झाला हे डोळ्यानी बघितले.  चंद्रपूर जिल्ह्याचे  आमदार म्हणून त्यांचा मान त्यांना मिळणे अगत्याचे आहे. राजकारणात  दुफडी असावी,  पण ती पुढे आणू नये असे आज सर्वसाधारण माणसाला वाटत होते.महाराष्ट्राच्या राजकारणात इतिहास रचणारे अपक्ष आमदार म्हणून निवडून आले. 
म्हणतात ना 'आप हमारा बुरा करो ,हम आपके बुरे व्यवहार का अच्छा ही लाभ उठायेंगे' असा चंग कदाचीत किशोर जोरगेवार यांचा दिसतो आहे.
 या सोहळ्यात खासदार बाळुभाऊ धानोरकर यांची  ओपनिंग एन्ट्री,  आणि लवकर  बाद होणे!
 ही त्यांची उपस्थीती ही संभ्रम निर्माण करणारी? 
कारण जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वेड्डट्टिवार  उपस्थित नसताना त्यांनी जी भूमिका बजावली ती नेमकी बरेच राजकीय प्रश्न निर्माण करून गेली. असे असतानाही गच्च भरलेल्या सोहळ्यात मोठ्या संख्येने उपस्थित राहावे लागलेल्या पोलिस प्रशासनाला अधिक तारेवरची कसरत न करता राजकारण लक्षांत आल्याने भूमिका बजावता आली व कुठल्याही गटात अनुचित प्रकार झाला नाहीं याचे समाधान पाहायला मिळाले. हे चित्र वाखाण्यासारखेच होते. तशी त्या पद्धतीने पोलीस प्रशासनाने  तगडा बंदोबस्तही करून ठेवला होता.
लोकार्पण सोहळाला कोणी लावली  आग!ती आग विझवण्याचे काम मि करणार? असे म्हणून   आमदार सुधीर मुनगंटीवार त्यांनी म्हणून हे खापर सरळ   आयुक्ताच्या माथी मारले? असे असले तरी,!
 पण शेवटी एक प्रश्न उद्भवतो तो असा की, चंद्रपूरच्या नेत्यांचा हा असा कोणता प्रोटोकॉल आहे ज्यामुळे चंद्रपूरच्या जनतेला  अजब गजब प्रकरण  चंद्रपूर कराना  अनुभवास मिळाले .