आझाद बगीचाच्या बांधकामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार - भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन न्यास

आझाद बगीचाच्या बांधकामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार - भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन न्यास

इस्टिमेट प्रमाणे स्टक्चरल ऑडिट करण्यात यावा
संबंधित ठेकेदार व कामावर देखरेख ठेवणारे पालिका अभियंता रडारावर!

दिनचर्या न्युज
चंद्रपूर

चंद्रपूर शहरातील ह्रदय स्थान असलेल्या आझाद बगीचाचे उदघाटन उद्या 26 तारखेला संध्याकाळी 7 वाजता होणार आहे. करोडो रुपयांचा निधीतून उभारलेल्या हा बगीचा लोकसेवेसाठी खुला केला जात आहे.
मात्र याच बगीच्याच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन न्यास यांनी केला आहे.

शहरातील मध्यभागी असलेल्या एकमेव आझाद बाग सौंदर्यीकरण करण्याचे काम मागील अडीच वर्षा पासून सुरु आहे. बांधकामात मोठ्या प्रमाणात गैरप्रकार झालेला आहे. बांधकाम करण्याकरिता बागेतील अनेक मोठे कडुलिंब, करंजी व इतर मोठे झाडे तोडण्यात आले आहेत.
पैदल चालण्या करीत रस्ता बांधकामात दगड टाकण्या ऐवजी सिमेंट काँक्रीट चे निघालेले तुकडे टाकण्यात आले आहे.
विटांच्या जुडाई करीत वाळू ऐवजी गिट्टीच्या पावडरचा वापर करण्यात आला.
रस्ता बांधकामात लोखंडी सळाखिची जाळी बनवायला पाहिजे होती परंतु सरळ सरळ कमी जाडीची सळाखी टाकण्यात अली आहे.
मुलांच्या खेळण्याचा ठिकाणच्या बाजूला सरळ मातीवरच सिमेंट काँक्रेट टाकण्यात आले.
 हिरवे लॉन लावण्या करीता शेत जमिनीची माती टाकायला पाहिजे होती परंतु तिथलीच दगड मिश्रित मातीवरच लॉन लावण्यात आले. 
पाणी जाण्याकरिता पाईप लाईन लहान आकाराची टाकण्यात अली असून त्याचा उतार सुद्धा बरोबर नाहि.
बांधकामाकरिता सिमेंटची सामुग्री निक्कुस्ट दर्जाची आहे.
संपूर्ण बांधकामात अनेक प्रकारच्या त्रुटी असून मोठ्या प्रमाणात गैरप्रकार झालेला आहे. इस्टिमेट प्रमाणे आझाद बाग सौंदर्यीकरण चे काम झालेले नाही. 
आझाद बाग सौंदर्यीकरण बांधकामात गैरप्रकार, भ्रस्टाचार झालेला असून त्याचे इस्टिमेट प्रमाणे स्टक्चरल ऑडिट करण्यात येऊन संबंधित ठेकेदार व कामावर देखरेख ठेवणारे पालिका अभियंता यांच्यावर कारवाई करावी तसेच तक्रार निकाली निघत नाही तो परेंत कोणतेही रक्कम ठेकेदाराला देण्यात येऊ नये असे भ्रष्टाचार विरोधी जण आंदोलन  न्यास समितीचे जिल्हाध्यक्ष अविनाश आंबेकर यांनी आझाद बाग सौंदर्यीकरण बांधकामात गैरप्रकार झालेला असून त्याचे स्टक्चरल ऑडिट करण्यात यावा अशी मागणी तक्रार आज महानगरपालिकेत मा आयुक्त चंद्रपूर महानगर पालिका, चंद्रपूर यांच्याकडे केली आहे.