भोयर दवाखान्याला मनपाकडून कुठलीही परवानगी नसल्याचे माहिती अधिकारात उघड!


भोयर दवाखान्याला मनपाकडून कुठलीही परवानगी नसल्याचे माहिती अधिकारात उघड!

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
चंद्रपूर महानगरपालिकेच्या भोंगळ कारभारामुळे   शहरात बोगस  दवाखाने खोलून बसले  आहेत. कुठल्याही प्रकारची महानगरपालिकेत दवाखान्याची नोंद मनपाकडे  नसल्याचे माहिती अधिकारात उघड झाले आहे. असाच प्रकार चंद्रपुरातील नामवंत डॉक्टर  वैभव भोयर यांचे  भोयर हॉस्पिटल नावाने सुरू करून त्यामध्ये दहा बेडचे नर्सिंग होम चालू करून सरास रुग्णांना  वेटिज धरल्या जात आहे. हा दवाखाना भु.पा. क्रमांक7638 जटपुरा सीट क्रमांक दोन   ब्लॉक न.57 पालिकेकडून932,932/2 येथे  सुरू आहे. यामध्ये पालिकेकडून नर्सिंग होम च्या नावाने बांधकामाची परवानगी नाही. फायर व एमपीसीबी ची परवानगी नाही. अशा दवाखान्यामध्ये जर अचानक अनुचित प्रकार घडला तर यास जबाबदार कोण?  अशा प्रकारच्या दवाखान्याकडे   मनपा हेतू पुरस्कार दुर्लक्ष करीत असल्याचे यावरून दिसून येते. मनाच्या हलगर्जीपणामुळेच  अहमदनगर जिल्ह्याची पूर्णावृत्ती करण्याची वाट बघत तर नाही ना असा प्रश्न उपस्थित होतो! चंद्रपूर मध्ये अशा प्रकारच्या दवाखाने जनतेला  लुबाडल्या करिता  मनपाकडून रीतसर परवानगी न घेता. बोगस दवाखाने उघडण्यासाठी  मनपाची अंध भूमिका असून यामुळे जनतेचे नुस्कान होईल असाच प्रकार चंद्रपूरला भोयर हॉस्पिटल मध्ये घडत आहे.  या दवाखान्याला  मनपाकडून बांधकामाची परवानगी नसल्यामुळे पालिकेचे दहा ते पंधरा लाखाचे नुकसान सुद्धा झाले आहे. या सगळ्या बाबींचा विचार करून दवाखान्याची परवानगी त्वरित रद्द करून  योग्य ती कारवाई करावी  अशी मागणी करण्यात येत आहे.