नाभिक समाजाला (अनुसूचित जाती प्रमाणे) शैक्षणिक, सामाजिक व राजकीय आरक्षण मिळन्यासाठी स्वतंत्र अभ्यास गट निर्माण - मंत्री धंनजय मुंडे




नाभिक समाजाला (अनुसूचित जाती प्रमाणे) शैक्षणिक, सामाजिक व राजकीय आरक्षण मिळन्यासाठी स्वतंत्र अभ्यास गट निर्माण.
- मंत्री धंनजय मुंडे

दिनचर्या न्युज :- 
*मुंबई - नाभिक समाजाच्या आरक्षणाच्या विषया संदर्भात मंगळवार, दि. ०५ एप्रिल २०२२ रोजी दुपारी १.०० वाजता दालन क्र. १०२ मंत्रालय मुंबई येथे सामाजिक न्याय मंत्री धनंजयजी मुंडे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली तर महाराष्ट्र नाभिक महामंडळ चे अध्यक्ष कल्याणराव दळे साहेब यांच्या प्रमुख उपस्थिति मधे बैठक पार पडली. यावेळी बैठकीला संबंधित खात्याचे सर्व सचिव, अधिकारी तसेच महाराष्ट्र नाभिक महामंडळ चे प्रदेश कार्याध्यक्ष तथा आरक्षण समिति चे अध्यक्ष दामोदरराव बिडवे काका, सर्वभाषिक परिट धोबी समाज महासंघ महाराष्ट्र राज्याचे कार्याध्यक्ष अनिलभाऊ शिंदे, महाराष्ट्र नाभिक महामंडळ चे प्रदेश सरचिटणीस पांडुरंगजी भवर, यूवक प्रदेशाध्यक्ष सुरेंद्र भैया कावरे, अमरावती विभागीय अध्यक्ष गजाननभाऊ वाघमारे प्रामुख्याने उपस्थित होते. नाभिक आरक्षण समिति च्या माध्यमातून घेण्यात आलेल्या या बैठकीला फलित मिळाले व मंत्री धनंजय मुंडे यांनी नाभिक समाजाला (अनुसूचित) जाती प्रमाणे शैक्षणिक, सामाजिक व राजकीय आरक्षण मिळावे यासाठी स्वतंत्र अभ्यास गट स्थापन केला. येणाऱ्या काळात नाभिक समाजाला न्याय मिळवून देण्याचा पूर्ण प्रयत्न करू असे आस्वासन त्यांनी यावेळी दिले.

दिनचर्या न्युज