पंचायत समितीमध्ये आरो मशीनच्या थंड पाण्याने मिळतो अभ्यागतांना दिलासा

पंचायत समितीमध्ये आरो मशीनच्या थंड पाण्याने मिळतो अभ्यागतांना दिलासा

दिनचर्या न्यूज:-

चंद्रपूर:-
चंद्रपूर पंचायत समितीच्या आवारात पिण्याच्या पाण्यासाठी आरो मशीन लावल्याने मनसोक्त पिण्याच्या पाण्याचा आस्वाद घेता येत आहे.गाव खेड्यातून येणार्‍या नागरिकांना पाण्यासाठी लाई लाई करावी लागत होती. उष्णतेच्या वाढत्या तापमानात तहानलेल्यांना पाणी मिळावे म्हणून पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनी परिसरात आरो मशीन लावून थंड पाण्याची व्यवस्था करून दिल्याने अभ्यागतांना थंड पाण्याचा आस्वाद घेता येत आहे. त्यामुळे पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांचे नागरिकांनी आभार मानले आहे. वरवट येथून आलेल्या गाव प्रमुख सरपंच सौ. सुमित्रा रायपुरे यांनी थंड पाण्याचा आस्वाद घेतला. भर उन्हात आल्यामुळे त्यांनाही थंड पाण्याची आवश्यकता असल्याचे बोलून ,पाणी पिल्याने मन शांत झाल्याने पंचायत समितीचे आभार मानले .
एवढेच नाही तर या परिसरातील शासकीय कामासाठी आलेल्या नागरिकांनीही आपली तहान भागावी म्हणून पंचायत समितीत लावलेल्या आरो मशीनच्या थंड पाण्याचा आस्वाद घेत आहेत. पाण्यासाठी इकडेतिकडे भटकणा- यांना चांगला दिलासा मिळाल्याने पंचायत समितीचे  कौतुक केले जात आहे.