गट ग्रामपंचायत नागाळा (सी )येथील सरपंचासह दोन सदस्य अपात्र !
गट ग्रामपंचायत नागाळा (सी )येथील सरपंचासह दोन सदस्य अपात्र !

*सरकारी जागेवर अतिक्रमण करून घर बांधणे सदस्यांना भोवले!

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर
जिल्ह्यातील पंचायत समिती चंद्रपूर अंतर्गत येत असलेल्या नागळा(सी) या ग्रामपंचायतीचे सरपंचासह दोन सदस्य अपात्र झाले आहेत. सदर तक्रार
*श्री प्रविण वसंता मानकर* , रा. लहुजी नगर, चिंचाळा, ता. जि. चंद्रपूर यांनी केली होती. संबंधित सदस्यांनी सरकारी जागेवर अतिक्रमण करून बांधकाम केले होते.
यांच्या तक्रारीवरून माननीय जिल्हाधिकारी यांनी सरपंचसह दोन्ही सदस्यांना अपात्र ठरवले आहे.
अपात्र ठरविण्यात आलेल्या सदस्यांपैकी *सरपंच सौ. रंजना अंबर कांबळे* प्रभाग चार मधून निवडून आल्या होत्या, ग्रामपंचायत *सदस्य सौ भारती अतिश चिमुरकर (तिवाडे)* , ग्रामपंचायत *सदस्य एकनाथ विठोबा देवतळे,* रा. लहुजी नगर, चिंचाळा, ता. जि. चंद्रपूर यांचा समावेश आहे.यांचे विरुध्द *महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 चे कलम 14 (1) (ज-3) अन्वये अपात्रतेची* कार्यवाही करण्याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयास तक्रार अर्ज दाखल केला होता. सदर तक्रार अर्जाचे अनुषंगाने प्रकरण पंजीबध्द करण्यात आले. प्रकरणात अर्जदार व गैरअर्जदार यांना तक्रार अर्जाचे अनुषंगाने त्यांची बाजू मांडण्याकरीता नोटीस काढण्यात येवून प्रकरणात आवश्यक सुनावण्या घेण्यात आल्या.
अर्जदार यांनी सादर केलेल्या अर्जात व लेखी युक्तीवादात खालील बाबी नमूद केलेल्या आहेत.
गट ग्रामपंचायत नागाळा (सी) ची सार्वत्रीक निवडणूक सन २०२०-२१ मध्ये घेण्यात आली होती त्यात ते निवडून आले होते.ग्रामपंचायत निवडणूकीच्या नामनिर्देशन सादर करतांना गैरअर्जदार क्रमांक १ यांनी निवडणूक आयोगा समोर चुकीची माहिती पुरवून निवडणूक आयोगाची दिशाभूल केलेली आहे. *महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम, १९५८ चे कलम १४ (ज-३) अन्वये ग्रामपंचायत सदस्यांनी सरकारी जागेवर अतिक्रमण करता येत नाही. तसे केल्यास ते ग्रामपंचायत सदस्य पदावर राहू शकत नाही.* परंतु सौं रंजना कांबळे, एकनाथ देवतळे व भारती अतिश चिमुरकर (तिवाडे ) यांनी लहुजी नगर येथे सरकारी जागेवर अतिक्रमण करून घर बांधलेले आहे. त्यामुळे ते ग्रामपंचायत सदस्य म्हणून राहण्यास अपात्र आहेत. असा निवाळा माननीय जिल्हा अधिकारी यांनी दिला आहे. त्यामुळे नागाळा ग्रामपंचायत येथील सरपंचासह दोन सदस्य अपात्र झाले आहेत. सदर कारवाईत अभियोक्ता म्हणून एडवोकेट श्री विजय आमटे यांनी काम पाहिले होते.