वरोरा येथील पंजाबी धाबा मालकासह इतर साथीदारकडुन पेट्रोल पंप मालकावर जीवघेणा हमला!
वरोरा येथील पंजाबी धाबा मालकासह इतर साथीदारकडुन पेट्रोल पंप मालकावर जीवघेणा हमला!

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
वरोरा पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या पंजाबी ढाबा रामपूर येथे राजु बहेलीम मालकाच्या आशीर्वादाने पेट्रोल डिझेल टँकर गाड्या इथे खाली होत असल्याचा संशय आल्याने. चंद्रपूर येथील पेट्रोल पंप मालक गोलापल्लीवार यांनी जाऊन बघितले असता तर त्यांना पेट्रोल टॅंकर मधील  पेट्रोल काढताना काही  इसम आढळून आले.  मात्र धाबा मालकासह इतर सहकाऱ्यांनी त्यांच्यावर  जानलेवा हमला केला. उलट तुम्ही चोर आहात आम्हाला धमकी देता का म्हणून त्यांना मारहाण करून आपल्या गाडीत बसून पोलीस स्टेशनला आणले. आमचे कोणीच काही वाकडे करत नाही  या तोऱ्यात वागून   पोलीस स्टेशन आमच्या   बापाचे असल्याचे  सांगून उलट पेट्रोल पंप मालकाला दम देत होते. मात्र घडले उलट संबंधित पेट्रोल पंप मालकासह इतर सहकार्यावर विविध कलमांतर्गत पोलीस स्टेशन येथे गुन्हे दाखल करण्यात आले आहे. यात  आरोपी राजु बहेलीम,ईश्वर बेडकर, दत्तात्रय पांढरे,व व इतर साथीदारांवर  भारतीय दंड संहिता १८६०  अन्वे  कलम 323, 324  326, 379, 511, 34 ,  वरोरा पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास वरोरा पोलीस ठाण्याचे ठाणेदार करीत आहेत
 सदर  यांच्या तक्रारीवरून पोलीस स्टेशन वरोरा दि. 01/04/2022 नाव: विक्रांत अंजेश गोलापल्लीवार, वय 34 वर्षे, जात-कलार, धंदा-पेट्रोलपंप, रा. भिवापूर वार्ड, चंद्रपूर मो. क्र. 8668438564. मी समक्ष विचारल्यावरून सांगतो कि, वरील ठिकाणी राहतो. मानस अॅग्रो एजेंसी, ग्राम नागाडा, घुग्गुस रोड, ता. जि. चंद्रपूर पेट्रोलपंपचा व्यवसाय करतो. सदर पेट्रोलपंप मानस अॅग्रो एजेंसी व माझी आई नाम पद्मा अंजेश गोलापशीवार यांचे पार्टनरशीपमध्ये असुन नायरा एनजीस कंपनीचे पेट्रोलपंप आहे. दिनांक 31/03/2022 रोजी मी नायरा वर्धा येथील नायरा एनजीस. लि. कं. चे पेट्रोल डेपोमध्ये पेट्रोलपप करीता 5000 लिटर पेट्रोलची ऑर्डर दिली होती. आज दिनांक 01/04/2022 रोजी नायरा एनर्जीस, लि. के. वर्षा डेपो यांचा माझे पेट्रोल पंपचे मनेजर रामू नरसय्या पुरुषोत्तमवार, रा. भिवापूर वार्ड, चंद्रपूर यांचे मोबाईलवर 09/37 वा. दरम्यान मसेज आला कि, मागणी केलले 5000 लिटर पेट्रोल त्यांचे डेपोमधून टंकर ट्रक क्रमांक MH40 CD0909 यामध्ये चंद्रपूर करीता डिझाले आहे. सदर टंकरमध्ये आमचे व एच. के. पेट्रोलपंप एम. आय. डी. सी. चंद्रपूर तसेच रघुवीर पेट्रोलपंप, बाबुपेठ, बायपास रोड, चंद्रपूर यांचे सुध्दा पेट्रोल येणार होते. सकाळी 09/45 वा. दरम्यान मी व माझे मामा रामू पुरुषोत्तमवार तसेच माझा कार ड्रायव्हर प्रकाश आत्राम असे तीही माझ्या फोर व्हिलरने नागपूर येथे मानस अग्रो एजेन्सीचे नागपूर ऑफीसमध्ये जाण्याकरीता निघालो. सकाळी 10/50 वा. दरम्यान आम्ही ग्राम रामपूर, ता. वरोरा येथे पंजाबी धाब्यासमोर पोहोचलो असता आमचे पेट्रोलपंप करीता पेट्रोल घेवून येणारा टंकर ट्रक क्रमांक MH40 CDO909 हा पंजाबी धाब्याकडे वळताना दिसला. तो ट्रक पंजाबी धान्याचे मागे जात होता. म्हणून मी पंजाबी धाब्यावर गाडी घेवून गेलो. आम्ही धाब्यावर गेलो आणि 3 चहा बनवायला सांगीतला. त्यादरम्यान मी धाब्याचे मागे जावून असता पाहिले असता त्या ठिकाणी एका झोपडीमध्ये पाच सहा काळ्या-निळ्या रंगाचा प्लस्टीकच्या मोठ्या डबक्या, प्लस्टीक डबे, केरोसीन चाळणी, प्लस्टीक पाईप दिसुन आले व दोन लोक दिसुन आले. त्यातील टकरचा क्लीनर एका काळ्या रंगाचा प्लस्टीक डबकीमधून दुसया डबकीमध्ये पेट्रोल टाकताना मला दिसला व दोन-तीन इसम टकर ट्रक क्रमांक MH40 CD0909 जवळ उभे दिसले ते लोकं टंकरमधून पेट्रोल काढत असल्याची मला संशय आला. म्हणून मी त्यांचे फाटो काढण्याकरीता माझा मोबाइल काढला तेव्हा पंजाबी ढाब्याचा दाबामालक माझ्याजवळ आला आणि मोबाईलमध्ये फोटो काढण्यास मला अडथळा निर्माण करू लागला. त्यावेळी माझे मामा व ड्रायव्हर तेथे आले. मी मोबाईलमध्ये फोटो काढण्याचा प्रयत्न करीत असताना ढाबा मालकाने टंकरला तेथून निघून जाण्याचे सांगीतल्याने टेकर क्रमांक MH40 CD0909 चे चालक व त्याचा क्लीनर तेथून टंकर घेवून निघून गेले. त्यानंतर मी दाबाचालकाला पोलीसमध्ये तक्रार करतो असे सांगीतले व माझ्या मोबाईलमध्ये व्हिडीओ काढत असताना ढाबामालक य त्याचा इतर साथीदारांनी मला व माझे मामा रामू पुरुषोत्तमदार यांना लाथाबुक्याने मारहाण केली व त्यापैकी एका पिवळ्या रंगाची टीशर्ट घातलेल्या अंदाजे 22-25 वयाचा इसमाने माझे डोक्याचे मागे लाकूडी काठीने मारल्याने डोक्यातून रक्त निघू लागले व माझ्या उजवा हाताला सुज आली असुन चेहयावर, पाठीवर, पोटावर मुका मार लागला आहे. त्याचप्रमाणे माझे मामा रामू पुरुषोत्तमवार यांना मुक्का मार लागून सुज आलेली आहे. त्यानंतर आम्ही व ढाबामालक असे पोलीस स्टेशनला आलो तेव्हा पंजाबी धाब्याचे मालकाचे नाव राजू बहेलीम असल्याचे मला माहित झाले. आज दिनांक 01/04/2022 रोजी पंजाबी ढाबा, ग्राम रामपुर, ता. वरोराचे मालक राजू बहेलीम टंकर क्रमांक MH40 CD0909 से चालक नाभे ईश्वर बेडकर, रा. नागपूर व क्लिनर नामे दत्तात्रय पांढरे, रा. अहमदनगर यांचेसह संगणमत करून टेकर क्रमांक MH40 CD0909 मधून पेट्रोल इंधनाची चोरी करण्याचा प्रयत्नात असताना राजू बहेलीम याने त्याचा साथीदारासह मला व माझे मामा रामू पुरुषोत्तमवार यांना लाथबुवयाने व काठीने मारहाण केली आहे. तरी राजू बहेलीम, ईश्वर बेडकर, रा. नागपूर व क्लिनर नामे दत्तात्रय पांढरे, रा. अहमदनगर तसेच व राजू बहेलीम याचे इतर साथीदार यांचेवर कायदेशीर कार्यवाही करणेस तोंडी रिपोर्ट देत आहे. माझा तोंडी रिपोर्ट माझे सांगणेप्रमाणे लपटपवर टाईप करण्यात आला असुन प्रिंट काढल्यावर वाचुन पाहीला बरोबर लिहिलेला आहे.  या प्रकारची तक्रार नोंदवण्यात आली असून
 अशा प्रकारच्या डिझेल पेट्रोल चोरीच्या  प्रकारात चंद्रपूर जिल्ह्यात सर्रास वाढ होत असल्याचे निदर्शनात येत असल्याने संबंधित हल्लेखोरांवर कडक  कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.