वैद्यकीय गर्भपात कायद्याचे उल्लघंन झाल्याचा ठपका ,पाझारे नर्सिंग होमचा परवाना निलंबित!





वैद्यकीय गर्भपात कायद्याचे उल्लघंन झाल्याचा ठपका ,पाझारे नर्सिंग होमचा परवाना निलंबित!


दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
चंद्रपूर शहरातील बाबुपेठ परिसरात असलेले डॉक्टर पाझारे नर्सिंग होम यांना महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या पथकाने कारवाई केली आहे. नर्सिंग होम मध्ये अनेक दिवसापासून गर्भपात कायद्याचे उल्लंघन केल्याच्या तक्रारी प्राप्त होत होत्या.
मनपा चंद्रपूर येथे दि . १३/०५/२०२२ रोजी झालेल्या पिसीपिएनडीटी मनपा सल्लागार समिती सभेतील सविस्तर चर्चेनुसार, डॉ . सौ . शरयु सुधाकर पाझारे , पाझारे नर्सिंग होम , महात्मा फुले चौक जवळ , बाबुपेठ , चंद्रपूर येथील वैद्यकीय गर्भपात केंद्र नोंदणी कं . १७८० येथे Non Maintenance of Records ( अभिलेखांची देखभाल न करणे ) न केल्याने सदर ठिकाणी त्यांच्याकडून वैद्यकीय गर्भपात कायद्याचे उल्लघंन झाले असल्याचे स्पष्ट झाले. वैद्यकीय आरोग्य अधिकारी, अध्यक्षा वैद्यकीय गर्भावस्था समिती, मनपा चंद्रपूर व मा . समुचित प्राधिकारी तथा आयुक्त, मनपा , चंद्रपूर यांनी दि . १३/०५/२०२२ रोजी दिलेल्या मौखिक आदेशान्वये सदर ठिकाणी पिसीपिएनडीटी कक्षाद्वारे तपासणी केली.
अभिलेखांची देखभाल न केल्याने वैद्यकीय गर्भपात कायद्याचे उल्लघंन झाल्याचा ठपका ठेवून बाबुपेठ येथील
डॉ. सौ. शरयु सुधाकर पाझारे यांच्या पाझारे नर्सिंग होम , येथील वैद्यकीय गर्भपात केंद्र नोंदणी क्रं . १७८० चे नोंदणी प्रमाणपत्र निलंबीत करण्यात आला आहे. ही कारवाई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या पथकाने केली असून, 30 दिवसांसाठी परवाना निलंबित करण्यात आला आहे. मनपाच्या डॉक्टर नैना उत्तरवार यांच्या नेतृत्वात कारवाई करण्यात आली.
डॉ . सौ . शरयु सुधाकर पाझारे , पाझारे नर्सिंग होम , महात्मा CACM 119 ( फुले चौक जवळ , बाबुपेठ , चंद्रपूर येथील वैद्यकीय गर्भपात केंद्र नोंदणी क . १७८० नोंदणीकृत प्रमाणपत्र हे ३० दिवसाकरीता निलंबनाची कार्यवाही करण्याकरीता आदेशित केले आहे .

त्याअनुषंगाने मा . वैद्यकीय आरोग्य अधिकारी अध्यक्षा , वैद्यकीय गर्भावस्था समिती , मनपा चंद्रपूर व मा . समुचित प्राधिकारी तथा आयुक्त , मनपा चंद्रपूर पानी दि . १३/०५/२०२२ रोजी पिसीपिएनडीटी मनपा सल्लागार समिती सभेत दिलेल्या मौखिक आदेशान्वये डॉ . सौ . शरयु सुधाकर पाझारे , पाझारे नर्सिंग होम , बाबुपेठ चंद्रपूर येथील वैद्यकीय गर्भपात केंद्र नोंदणी कं . १७८० चे नमुद नोंदणी प्रमाणप्रत्र मनपाकडून दि .१८ / ०५ / २०२२ ते दि.१६ /०६ / २०१२ पर्यंत एकूण ३० दिवसाकरीता निलंबित करण्यात येत आहे .

सदर कालावधीत पाझारे नर्सिंग होम येथील वैद्यकीय गर्भपात केंद्र हे कायम स्वरूपी बंद ठेवण्याची सूचना देण्यात आली असून, १७ / ० ९ / २०२२ रोजी पासून पाझारे नर्सिंग होम येथील वैद्यकीय गर्भपात केंद्र पूर्ववत सुरु करण्यात यावे. परंतु बंदी करण्यात आलेल्या कालावधीत वैद्यकीय गर्भपात केंद्रा संबंधी काही प्रकार घडल्यास किंवा सदर घटन पुन्हा पाझारे नर्सिंग होम येथे उपरोक्त संदर्भात घडल्यास The Medical Termination of Pregnancy ) Act 1971 and The Mumbai Nursing Home ( Amendment ) Act 2006 , The Maharashtra Nursing Home Registration ( Amendment ) Act 2006 कायद्याअन्वये , डॉ . सौ . शरयु पाझारे व पाझारे नर्सिंग होम , बाबुपेठ , चंद्रपूर यांचेवर मनपा कडून प्रशासकिय आरोग्य अधिकारी डॉक्टर उत्तरवार यांच्यासह टीमणी कारवाई केली.