चंद्रपूर येथील लालपेठ येथील ऐतिहासिक स्मारक स्थळी पुरातत्त्व विभागाच्या वतीने 'जागतिक संग्रहालय दिवस' साजरा chandrapur
चंद्रपूर येथील लालपेठ येथील ऐतिहासिक स्मारक स्थळी पुरातत्त्व विभागाच्या वतीने 'जागतिक संग्रहालय दिवस' साजरा

*जागतिक संग्रहालय दिवस व आझादी का अमृत महोत्सवनिमित्त आयोजन*

*लालपेठ येथील खुले संग्रहालय असलेले स्थळ प्रकाश व्यवस्थेने उजाळले*

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर: आज 'जागतिक संग्रहालय दिन' निमित्त लालपेठ येथील ऐतिहासिक स्मारक असलेले दशमुखी दुर्गा मूर्तिसमुह ठिकाणी प्रत्येक स्मारक वर प्रकाश व्यवस्था करीत साजरा करण्यात आला.

भारतीय पुरातत्व सर्वेक्षण मंडळ नागपूर आणि इको-प्रो चंद्रपुर यांच्यावतीने आजादीच्या अमृतमहोत्सवानिमित्त आज 18 मे रोजी सायंकाळी लालपेठेतील दशमुखी दुर्गा मूर्तिसमुह - अपूर्ण देवालय येथे आंतरराष्ट्रीय संग्रह दिवस कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भारतीय पुरातत्व सर्वेक्षण मंडळचे अधीक्षक विजयकुमार नायर, पुरातत्व अभियंता मिलिंद अंगाइतकर, इको-प्रो चे बंडू धोतरे, संरक्षण सहायक शाहिद अख्तर उपस्थित होते.

याप्रसंगी भारतीय पुरातत्व सर्वेक्षण मंडळचे अधीक्षक विजयकुमार नायर म्हणाले, चंद्रपूर शहरामध्ये ऐतिहासिक वारसा मोठ्या प्रमाणात असून, त्याच्या जतनासाठी पुरातत्व खात्याकडून प्रयत्न केले जाणार असून लालपेठ येथील प्राचीन वास्तूंचे जतन करण्यासाठी नियोजन करण्यात आलेले आहे. यासोबतच हेरिटज वाक मार्ग व रामाला तलाव मधील तुटलेल्या किल्ल्याच्या भिंतीची दुरस्ती चालू आर्थिक वर्षात करण्याच्या निर्णय घेण्यात आलेला आहे. यावेळी इको प्रो अध्यक्ष बंडू धोतरे धोतरे म्हणाले, ऐतिहासिक वास्तूंचे जतन करण्यासाठी व्यापक जनजागृतीची गरज आहे. स्थानिक नागरिकांच्या सहभाग मुळे या ऐतिहासिक वास्तुचे संवर्धन शक्य आहे.

कार्यक्रमाचे संचालन सहायक अधीक्षक अभियंता मिलिंद अंगाईतकर यांनी केले. यावेळी संरक्षक सहाय्यक शाहिद अख्तर, संरक्षक सहाय्यक सचिन कौशिक, अब्दुल जावेद यांच्यासह इको-प्रो च्या कार्यकर्त्यांची व स्थानिक पुरातत्व विभाग चे कर्मचारी उपस्थिती होते.