चंद्रपुर ताडोबातील वयोवृद्ध "वाघडोह" वाघाचा मृत्यू

चंद्रपुर ताडोबातील वयोवृद्ध "वाघडोह" वाघाचा मृत्यू

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
मागील दोन दिवस आगोदरच या वाघाचे काही क्षणचित्रे वायरल झाले होते. शिराळा गावातील एका गुरे चालणाऱ्या वृद्ध वर हल्ला करून त्याला ठार केले होते. हा वाघ वयस्कर असल्याने वन्य प्राण्यांची शिकार करणे त्याला अवघड झाले होते.
चंद्रपुरातील ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील सर्वात मोठा आणि वयस्क असलेल्या "वाघडोह" वाघाचा आज सोमवारी मृत्यू झाला, हा वाघ वयस्क असल्यानं त्याला शिकार करणे अशक्य होते, तसेच त्याने सिनाळा गावालगत आपले बस्तान मांडले होते. 2 दिवसांपूर्वी याच गावातील एका वृद्धाचा त्याने बळी सुद्धा घेतला.

या परिसरात गेल्या काही दिवसांपासून वाघडोह या ताडोबातील प्रसिध्द वाघाचा वावर होता.Tiger Death अतिशय म्हातारा आणि अशक्त असलेला वाघडोह माणसं आणि पाळीव जनावरांसाठी धोकादायक ठरू शकतो ही शक्यता लक्षात घेता वनविभाग वाघावर नजर ठेवून होता. मात्र आज सोमवारी वाघडोह वाघाचा मृत्यू झाला आहे.