आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट करणाऱ्याअभिनेत्री केतकी चितळे यांच्या विरोधात भारतीय दंड संहिता नुसार गुन्हा दाखल करा - -सुनिल दहेगांवकर

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरदचंद्रजी पवारसाहेब यांचे विरोधात फेसबुक पोस्ट मध्येआक्षेपार्ह फेसबुक पोस्ट करणाऱ्याअभिनेत्री केतकी चितळे यांच्या विरोधात भारतीय दंड संहिता नुसार गुन्हा दाखल करा - -सुनिल दहेगांवकर

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार श्री. शरदचंद्रजी पवार साहेब यांचे विरोधात फेसबुक पोस्ट मध्ये आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट अभिनेत्री केतकी चितळेने शेअर केली. केतकी चितळे नी हि पोस्ट शेअर केल्या मुळे पक्षातील नेते, कार्यकर्ते आणि लोकांना मध्ये तीव्र नाराजी आहे. त्यामूळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो.अभिनेत्री केतकी चितळे नी हि पोस्ट शेअर करून दोन राजकीय पक्षांमध्ये द्वेषाची भावना, तेढ निर्माण करण्याचे कृत्य केलं आहे.मा. श्री.शरदचंद्रजी पवा6र साहेब यांना उद्देशुन बदनामीकारक, मानहानीकारक हि पोस्ट आहे.
मा.श्री.शरदचंद्रजी पवार साहेब यांचे विरोधात आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट शेअर केल्याबद्दल अभिनेत्री केतकी चितळे यांच्या विरोधात भारतीय दंड संहिता नुसार गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी श्री. सुनिल दहेगांवकर महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभाग यांनी मा.जिल्हा पोलिस अधीक्षक चंद्रपूर, मा.पोलिस निरीक्षक सायबर क्राईम पोलिस स्टेशन चंद्रपूर व मा.पोलिस निरीक्षक रामनगर पोलिस स्टेशन चंद्रपूर यांच्या कडे केली आहे.या प्रसंगी श्री. प्रियदर्शन इंगळे जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभाग चंद्रपूर,श्री.प्रदिप रत्नपारखी माजी शहराध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस चंद्रपूर, श्री. संजय ठाकूर जिल्हा सचिव राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व श्री. कुणाल ठेंगरे जिल्हा महासचिव राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस हे उपस्थित होते.