धक्कादायक :- दुर्गापूर परिसरात रात्री आणखीन एक महिला ठरली बिबट्याची शिकार!

धक्कादायक :-
दुर्गापूर परिसरात रात्री आणखीन एक महिला ठरली बिबट्याची शिकार!

चंद्रपूर
चंद्रपूर जिल्ह्यातील वाढत्या वन्यप्राण्यांच्या हल्ल्यामुळे आतापर्यंत अनेकांचे जीव गेले या अगोदरही दुर्गापूर परिसरात छोटा बाळासह दोन जणांचा बळी गेला होता. यासंदर्भात राष्ट्रवादीचे युवा जिल्हाध्यक्ष नितीन भटाळकर यांनी आंदोलन केले होते. त्यांनी डब्ल्यूसीएलच्या अडेलतट्टूच्या धोरणासंदर्भात कार्यालयावर आंदोलन केले होते. त्या परिसरातील काही जंगली झुडपे साप करण्यात यावी करण्यात आली होती. वन विभागाच्या टीमने बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरे लावून त्याला बंदी केले होते. परंतु वन विभागाचापरिसर जवळ असल्यामुळे या परिसरात वन्य प्राण्यांचा वावर जास्त असल्यामुळे पुन्हा रात्री दुर्गापुरातील वार्ड क्रमांक तीन मधील सौ.मेश्राम वय 45 वर्ष महिलेवर रात्रौ 12 नंतर बिबट्याने हल्ला करून ठार केल्याची घटना घडली आहे. या परिसरात पुन्हा भीतीचे वातावरण पसरले असून नागरिकात दहशत पसरली आहे. वन विभाग आणि त्वरित पुन्हा हिस्त्र पशुचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे.
.