आर. के .बियर बार समोर वाहनांचा तबेला उत्पादन शुल्क विभागाचे दुर्लक्ष! बियर बार सकाळीच उघडल्याची परवानगी आहे का?

आर. के .बियर बार समोर वाहनांचा तबेला उत्पादन शुल्क विभागाचे दुर्लक्ष! बियर बार सकाळीच उघडल्याची परवानगी आहे का?

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
चंद्रपूर भिवापुर वार्डातील महात्मा फुले चौकात आर. के .बियर बार प्रस्थापित आहे. मात्र या बिअरबार ला कुठलेही वाहन पार्किंग नसल्याने वाहन चा तबेला हा रस्ता वर असतो. मुख्य चौक असल्यामुळे महिलांपासून सर्वच नागरिकांना या चौकातून जावे लागते .त्यातल्यात दारुड्यांचा न हा त्रास सहन करून आपला जीव मुठीत घेऊन महिलांना तिथून जावा लागते. या चौकात अनेक वेळा छोटे-मोठे वाद-विवाद नाहीतर मोठे प्राणघातक हमले सुद्धा या बारमधून नशा करून निघालेल्या कडून झालेले आहेत. आर के बार मध्ये भरमसाठ एमआरपी च्या व्यतिरिक्त जीएस टी बिल न देता ग्राहकाकडून सर्रास लूट सुरू आहे. . लुटण्याचा सपाटा सुरू केला आहे यावर दारूबंदी ऑफिस चे कुठलेही नियंत्रण नसून सर्रास पाठबळ असल्याचे निदर्शनास येतआहे . हे चौक भिवापूर वाड्याचे मुख्य चौक असल्यामुळे या चौकात नेहमीच वर्दळ असतात. मात्र रात्रीच्या वेळेस गाड्यांची पार्किंग रस्त्यावर असल्यामुळे अनेकांना याचा त्रास सहन करावा लागतो.
एवढेच नाही तर दारूबंदी विभागातून संबंधित परवानाधारकांना आपल्या आस्थापन खोलण्याचे वेळ ठराविक असतो .मात्र याचे दुकान सकाळी आठ वाजता आतच सुरु होतात .आणि मागील दारातून सर्रास दारू विक्री केली जात आहे. एवढेच नाही तर महाकाली भिवापूर परिसरात अशा अनेक बार मालकांचे बार सकाळी खोलून सुरू केला जात आहे .अनेक दारू बार मालकांचे मागील दरवाजातून दारू विक्री सुरू असताना .राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांचे डोळेझाक पणा हा आर्थिक व्यवहारातून असल्याचे दिसून येत असल्याचे उघड होत आहे. यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी कारवाई करतील का या  याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहेत.