वणीच्या 'हर्षल नक्षणे' नी बनविली स्वयंचलित 'स्वानिक कार'
वणीच्या 'हर्षल नक्षणे' नी बनविली स्वयंचलित 'स्वानिक कार'

१५० रुपयात धावते २५० किलोमिटर, प्रदुषण मुक्त कार...!

दिनचर्या न्यूज:-
वणी:- सध्याच्या काळात वाहन वापरणाऱ्यांची संख्या वाढली असून, दररोज हजारो वाहने रस्त्यावरून धावत आहे. वाहनातून निघणाऱ्या धुरामुळे प्रदुर्षण वाढले असून, नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. तसेच पेट्रोल व डिझेलचे दर १२० रुपयांवर पोहचले आहे. यावर उपाय म्हणून वणी येथील तल्लख बुध्दीच्या हर्षल नक्षणे नामक युवकाने आपल्या कुणाल आसुटकर नावाच्या मित्राच्या मदतीने अफलातून अशी प्रदुषण मुक्त स्वयंचित 'स्वानिक कार' तयार केली आहे.

वणी शहरात हर्षल महादेव नक्षणे या युवकाने एम टेक पर्यंत शिक्षण घेतले आहे. या युवकाचे एक स्वप्न होते की, भारताकडे स्वतःची अशी सुपरकार असली पाहिजे, जी शून्य प्रदूषण करते आणि स्वतः धावण्यासाठी सक्षम असली पाहिजे. परवडणाऱ्या किमतीत ग्रीन हायड्रोजन ऊर्जा वापरणे आणि अपघात आणि मानवी चुका कमी होईल अशी कार हवी. त्या दृष्टीकोणातून हर्षल नक्षणे याने AICARS. IN या नावाने कंपनी रजिस्टर केली आहे. कुणाल आसुटकर या विज्ञान शाखेत भाग तीन ला शिक्षण घेत रुपये खर्च आला आहे. इंटरनेट सेवा पुरविण्याच्या असलेल्या बालपणीच्या मित्राच्या मदतीने स्वानिक वन व्यवसायातून मिळविलेल्या पैशातून ही कार
वणीतच बनविली कार, २५ लाख खर्च स्वानिक वन ही सुपर कार तयार करण्यासाठी लागणारे सुटे भाग वणीतच तयार केले आहे. फक्त कारसाठी लागणारे काच व टायर या वस्तू अहमदाबाद येथून खरेदी करण्यात आले. प्रायोगिक तत्वावर ही कार तयार केली असून, त्यासाठी तब्बल २५ लाख (SONIC ONE) कार बनविण्याचे काम सुरु केले. बनविल्याची माहिती हर्षल नक्षणे यांनी दिली. सेल्फ ड्रायव्हींग व हायट्रोजन फ्युल सिस्टमचे पॅटेट नोंदणी केली आहे. १०० कार तयार झाल्यानंतर ही कार २० ते ४० लाख किंमतीत विक्रीसाठी उपलब्ध राहणार असल्याची माहिती नक्षणे यांनी दिली.

गेल्या काही दिवसापूर्वीच ही कार तयार झाली आहे. हायट्रोजन गॅसवर चालविणारी ही कार आहे. सेल्फ डायव्हींगसाठी संगणक तयार केले आहे. ड्रायव्हरविना ही कार चालणार आहे. आपल्याला ज्या मार्गाने व ज्या ठिकाणी जायचे आहे तो मार्ग निवडा त्या ठिकाणी ही कार पोहचवणार आहे. एक लिटर हायट्रोजन (किंमत १५० रुपये) मध्ये २५० कि.मी. धावणार आहे.. त्यामुळे पेट्रोल व डिजेलवर चालणाऱ्या वाहनापासून सुटका होणार आहे. या कारने कुठल्याही प्रकारचे प्रदुषण होणार नाही.दिनचर्या न्युज