वंचित, निराधार व्यक्तीस लाभ मिळवून देऊ-ब्रिजभूषण पाझारे
ब्रिजभूषण पाझारे यांची संजय गांधी निराधार लाभार्थाशी चर्चा

वंचित, निराधार व्यक्तीस लाभ मिळवून देऊ-ब्रिजभूषण पाझारे


दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
मौजा नकोडा येथील क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडा सभागृह येथे निराआधार व्यक्तींची एकत्रित बैठक बोलावून चर्चा करण्यात आली. यावेळी संजय गांधी निराधार लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
माजी जिप सभापती ब्रिजभूषण पाझारे यांनी नकोडा गावातील निराधार व्यक्तीस लाभ मिळावा याकरिता अर्ज सादर करण्यास मार्गदर्शन केले. गावातील निराधार प्राप्त झालेल्या लाभार्थ्यांना पत्र वाटप करण्यात आले.मौजा नकोडा गावातील माया चोपडा यांना कर्करोग उपचारार्थ जिप राखीव निधी मधून राशी पंधरा हजार रुपयाचे धनादेश स्वरूप आर्थिक सहाय्य्य कारण्यात आले.
यावेळी उपस्थित मान्यवर माजी जि.प समाजकल्याण सभापती ब्रिजभूषण पाझारे, ग्रा.प सरपंच किरण बांदूरकर, माजी सरपंच ऋषी कोवे, उपसरपंच मंगेश राजगडकर, ग्राप सदस्य रजत तुरानकर,चंदर ताला माजी उपसरपंच नकोडा ,भाजपा अध्यक्ष श्री. बाळकॄष्ण झाडे प्रभाकर लिंगमपेल्ली, सौ. सुजाता गिद्दे, सौ. अर्चना पाझारे, सौ.जसबिर कौर, श्री. राजय्या कंपा सौ. हेमा ताला, महीला आघाडी अध्यक्ष सौ. सुचिता बोबडे ,श्रीतेश बुच्चे,अजय लोडे,सागर खंडाळे, अनिकेत गेडाम,स्वप्निल हनुमंते, विक्की कुळमेथे,गौरिष बुच्चे,प्रकाश काळे,आकाश काळे, वैभव निखाडे,राकेश धुळे,कबीर शेख,विक्की कोवे,राकेश नवले, अंकित कुमार,शुभम डोंगे यांची उपस्थिती होती.दिनचर्या न्युज :-