उद्या आषाढी एकादशी निमित्ताने वारीचे आयोजन
उद्या आषाढी एकादशी निमित्ताने वारीचे आयोजन

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
माऊली उद्या आषाढी एकादशी आणि आपण सर्व मिळून केलेले वारीचे आयोजन ही विठ्ठल वारी बाबू पेठ ते संत श्री नगाजी महाराज मंदिर पठाणपुरा ते विठू माऊली चे मंदिर विठ्ठल मंदिर वार्डपर्यंत राहील.
माऊली वारीचे प्रस्थान सकाळी 7 वाजता गुरुदेव चौक महादेव मंदिरापासून होईल. श्री संत नगाजी महाराज मंदिरात विसावा घेऊन वारी पुढे विठू माऊली च्यां मंदिरात दर्शनासाठी थांबेल दर्शन सोहळ्यानंतर सर्वांसाठी उपवासाच्या नाश्त्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे
माऊली ज्यांना शक्य आहे त्यांनी बाबुपेठ मधे वारीत सहभागी व्हावे.शक्य नसल्यास श्री संत नगाजी महाराज मंदिरात थांबून राहावे.
माऊली वारीचे मुख्य आकर्षण म्हणजे विठू माऊली ,माता रुख्मिणी ,श्री संत ज्ञानेश्वर माऊली ,श्री संत तुकाराम महाराज, संत जनाबाईं तथा भगवान श्रीकृष्णांची सुंदर अशी झाॅंकी असेल.वारकरी माऊलीच्या डोक्यावर सुंदर तुळसी वृंदावन, भगवी पताका सोबतच विठू नामाच्या गजरात वारीचे प्रस्थान!
तेव्हा माऊली सर्वांनी सहभाग घ्या असे आवाहन वारी आयोजकांनी केले आहे.
श्रद्धा, भक्तिभाव ठेवून वारीला जाऊया
हीच आपली पंढरी समजून विठुरायाला भेटूया
हरी ओम
जय श्री विठ्ठल