शेतकरी 'जयदेव' ठरला वीज कर्मचाऱ्यांचा देवदूत, वीज कर्मचाऱ्यांनी मानले मनापासून आभार





शेतकरी 'जयदेव' ठरला वीज कर्मचाऱ्यांचा देवदूत, वीज कर्मचाऱ्यांनी मानले मनापासून आभार.

दिनचर्या न्युज
गडचिरोली
दिनांक ३जुलै रोजी सायं ७ वाजता अडपल्ली ते मुलचेरा ३३ विजवाहिनीमध्ये विजा व पावसामुळे अचानक बिघाड झाल्याने मुलचेरा वितरण केंद्रातील कनिष्ठ अभियंता मंगेश बोन्डे व त्यांचे सहकारी कर्मचारीविनोद अ. बुरांडे (प्रधान तंत्रज्ञ), एस. आर. टिकले (वरीष्ठ तंत्रज्ञ), आर. एम. दडमल (वरीष्ठ तंत्रज्ञ), एस. व्ही. अर्के (वरीष्ठ तंत्रज्ञ), ए. एम. बावणे (वरीष्ठ तंत्रज्ञ), शजी. ए. सोरते (वरीष्ठ तंत्रज्ञ), टी. जे. गलबले, (वरीष्ठ तंत्रज्ञ), एस. पी. राठोड (विदयुत सहायक ) लाईन दुरुस्तीसाठी चपराळा अभयारण्याचा भाग असलेल्या गांधीनगर,वसंतपूर, लक्ष्मीपूर येथील जंगलात पोहोचले.
काळ्याकुट्ट अंधारात, रात्री टॉर्च च्या मदतीने बिघाड शोधनणयास त्यांनी सुरुवात केली. सात तासाच्या अथक परिश्रमा अंती रात्री ३ चे दरम्यान अडपल्ली -मुलचेरा ३३ विजवाहिनीमध्ये पिन इन्सुलेटर चा बिघाड सापडला व पावणे चार वाजता तो दुरुस्त करण्यात आला.
धो धो पडणारा पाऊस महावितरणच्या व कर्मचाऱ्यांचे सर्व लक्ष् बिघाड दुरुस्तीकडे. त्यामुळे सर्व नाले, तळे, ओढे एवढ्या वेळात दुथडी भरले.
३३ के व्ही मुलचेरा उपकेंद्र येथे दुसरा पर्यायी विजपुरवठा नसल्याने अडपल्ली लाईन वर विजपुरवठा सुरु करणे आवश्यक होते.तर दुसरीकडे जंगलात मोबाईल नेटवर्क नसल्याने संपर्क तुटला होता.
त्यासाठी जंगलातून लवकर बाहेर पडणे आवश्यक होते. त्यानुसार सर्व कर्मचारी लाईन दुरुस्तीचे काम आटोपल्यावर जंगलातून बाहेर पाडण्यासाठी निघाले.
धो धो पाऊस तसेच विजाचा गडगडाट सुरु होता आणि कर्मचारी जेव्हा,लभानतांडा येथील मोठ्या नाल्यावरील पुलापर्यंत पोहोचले तार तेथे कमरेपेक्षा जास्त पाणी होता व पाणी जोरात वाहत होते. पुलाची अर्धी बाजु फुटलेली असल्यामुळे पुलावरून जाणे म्हणजे सर्वांसाठी धोक्याची घंटा होती व इतर दुसरा मार्ग ही दिसत नव्हता व आसपास सुरक्षित ठिकाण पण नव्हते.


नाल्यापासून अर्धा किमी वर एक शेतकऱ्याची झोपडी होती. सर्व कर्मचारी त्या झोपडीकडे निवांऱ्यासाठी गेले, तेथे असलेल्या, शेतकरी श्री जयदेव युधिष्टी महालदार रा लक्ष्मीपूर यांना सदर पुलावरील पाणी कधीपर्यंत कमी होईल विचारळे असता , "बारिश चालु रहनेसे पाणी जल्दी नही उतरेगा इसलिये मै आपको जंगलसे दुसरे रास्तेसे लेके जाता हू जहाँ नालेको थोडा कम पाणी रहता है",  असे सांगून तो शेतकरी सर्व कर्मचाऱ्यांना घेऊन जंगलातील दुसऱ्या रस्त्याने निघाला. काही अंतरावर एक उंच व अरुंद बंधारा होता तो पारकरून ते चालत होते. शेतकरी समोर व सर्व कर्मचारी त्यांच्या मागे मागे चालत होते वाटेत दोन नाले पडले पण त्याचे पाणी जेमतेम कमरेइतकेच होते व तीव्रता पण कमी होती व नंतर थोड्याच वेळात  गावाजवळ व पोचल्याचे दिसल्याने सर्व कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद उमटला. देवदूतसारखा धावून आलेल्या बळीराजाचे सर्व कर्मचाऱ्यांनी मनापासून आभार मानून त्यांचा निरोप घेतला. लागलीच मुलचेरा उपकेंद्राचा विजपुरवठा सुरु करण्यात आला. बळीराजाने महावितरण कर्मचाऱ्यांना वाट दाखवीत त्यांचा जीव वाचवला व त्यांना अंधारातून बाहेर काढले, तर महावितरण कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नामुळे मुलचेरा अंधारातून बाहेर आले... विजपुरवठा पूर्ववत झाला.



दिनचर्या न्यूज :-