मनपा कक्षात आत्महत्या करणाऱ्या पवारचा धक्कादायक खुलासा, आश्रम शाळेच्या अनुदानासाठी आयुक्तांना 15 लाख दिले : पवार





मनपा कक्षात आत्महत्या करणाऱ्या पवारचा धक्कादायक खुलासा, आश्रम शाळेच्या अनुदानासाठी आयुक्तांना 15 लाख दिले : पवार

दिनचर्या न्यूज:-
चंद्रपूर:-
चंद्रपूर महानगरपालिकेच्या आयुक्त यांच्या कक्षात 19 ऑगस्टला लातूर जिल्हातील या गावी राहणारे लक्ष्मण पवार यांनी स्वतःच्या पोटावर चाकूने वार केले. काही वेळासाठी महानगरपालिकेत सर्वांचीच तारांबळ उडाली होती. सुरक्षारक्षकाने वेळीच सावधानतेचा पवित्रा घेत पोलिसांना पाचारण करण्यात आले. पुढील अनर्थ टळला.
यात जखमी झालेले लक्ष्मण पवार यांच्यावर चंद्रपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहे. तसेच शहर पोलीस ठाण्यात त्यांच्या विरोधात आत्महत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी भादवी कलम 309 अंतर्गत शहर पोलिस स्टेशन  मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मात्र लक्ष्मण पवार यांनी घडलेल्या घटनेबाबत धक्कादायक खुलासा केला आहे. आश्रमशाळेला अनुदान मिळवून देण्याचं अमिश दाखवून मनपा आयुक्त मोहिते यांनी आपल्याकडून 15 लाख रुपये घेतले. त्यावेळी ते तत्कालीन सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांचे स्वीय सहायक होते. मात्र, वारंवार तगादा लावूनही मोहिते यांनी पैसे परत केले नाही.  त्यामुळे मला आत्महत्या करण्याचा निर्णय घ्यावा लागला. असा धक्कादायक आरोप लक्ष्मण पवार यांनी  दिनचर्या न्यूज   सोबत  बोलतांनी केला आहे.
राजेश मोहिते यांनी  तत्कालीन सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले  यांचे स्वीय साहाय्यक असताना आश्रम शाळेच्या अनुदानाच्या नावाने पंधरा लाख रुपये 2016 मध्ये घेतले होते.. बाबासाहेब आंबेडकर शिक्षण प्रसारक मंडळाच्या आश्रमशाळेला अनुदान देण्यासाठी पैशांची मागणी केली.
. त्यानुसार यासाठी 14 लाख 70 हजारांची रक्कम देण्याचं ठरलं होतं. त्यानुसार पवार यांनी आश्रमशाळेच्या बांधकामासाठी 10 लाख खर्च केले. यादरम्यान पवार आणि त्यांच्या वडिलांनी मोहिते यांना आधी 10 लाख 70 हजार आणि नंतर 4 लाख रुपये अशी 2 टप्प्यात रक्कम दिली,
वारंवार कुठले ना कुठले कारण करून मोहिते  उद्या या  परवा या, आता अधिवेशन सुरू आहेत. असे कुठलेही कारण करून टाळाटाळ करण्याचा प्रयत्न करीत असत. दबावापुढे  आठ दहा दिवसात  दिवसात आश्रम शाळेला मान्यता मिळेल असे सांगत होते.
  . यानंतर मोहिते यांची नागपूर मनपा उपायुक्तपदी बदली झाली. त्यामुळे आता आपले काम होणार नाही, याची शाश्वती  लक्ष्मण पवार  याला झाली. . त्यानुसार त्यांनी पैसे परत करण्याचा तगादा लावला. यावेळी मोहिते 70 हजार परत देण्यात आले. उर्वरित रक्कम मिळण्यासाठी पवार सातत्याने प्रयत्न करत होते. त्यांनी चंद्रपूर मनपासमोर आमरण उपोषण करण्याचा प्रयत्नही केला. मंत्रालयासमोर आत्मदहनाचा देखील इशारा दिला होता. मात्र प्रशासकीय  
दबावापुढे त्यांचे काही जमले नाही. यानंतर पवार यांनी लातूर पोलीस ठाण्यात धाव घेतली. मात्र तिथल्या पोलिसांनी तक्रार घेऊन पवार यांच्यावर ही तक्रार मागे घेण्यास दबाव आणला. यादरम्यान मोहिते आणि पवार यांच्यात 2 मे 2022 ला कागदोपत्री करार झाला. या तडजोडपत्रावर आता यापुढे आपण राजेश मोहिते यांना कुठलाही मानसिक त्रास देणार नाही आणि आपली तक्रार आपण मागे घेत असल्याचे हमीपत्र द्यावे लागले.  
यादरम्यान मोहिते यांनी 3 लाख परत केले असल्याचे पवार यांनी  दिनचर्या न्यूजशी बोलताना सांगितले आहे.
लक्ष्मण पवार त्यांच्या म्हणण्यानुसार  दिव्यांग मुलाच्या उपचारासाठी आणि नोकरी खाजगी कंपनीत सेवक म्हणून कायमस्वरूपी लावण्याचा शब्द दिला होता. मुलाच्या त्यांचा सर्व खर्च उचलण्याची हमी दिली होती. मात्र त्यानंतर मोहिते यांनी कुठलाही  प्रतिसाद न देता फोन बंद केले. कुटुंबावर एकामागून एक संकट येत गेले. घराचा गाडा चालवणे कठीण झाले. त्यामुळे अखेर चा विचार करून आत्महत्या करण्याचा निर्णय पवार यांनी घेतला असल्याचे सांगितले.
चंद्रपुर  मनपा कार्यालयातील आयुक्त यांच्या फोनवरून संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता. त्यांचा फोन नॉट रिचेबल दाखवला गेला. मात्र,त्यांच्या व्हाट्सअप क्रमांकावर त्यांची बाजू जाणून घेण्यासाठी संपर्क केला असता त्यांनी 2 मे 2020 रोजी झालेल्या तडजोडपत्राची प्रत पाठवून हे स्वयंस्पष्ट असल्याचे सांगितले आहे. मात्र, त्यांना मानसिक त्रास देणारा वादाचा विषय नेमका कोणता होता. ज्यामुळे तडजोड करण्याची वेळ आली यावर त्यांनी कुठलेही स्पष्टीकरण दिले नाही.

  माझ्यात आणि मोहिते यांच्यात तडजोडीचा करारनामा करताना साक्षीदारांवर दबाव  आणून सह्या घेतल्या
त्यात शिवशंकर विश्वनाथ पाटील आणि अजयसिंग हरिसिंग राठोड यांच्या साक्षीदार म्हणून सह्या आहेत. आत्महत्येचे प्रकरण घडल्यामुळे या साक्षीदारांवर प्रचंड दबाव येत आहे. त्यांना पोलिसांसह वेगवेगळ्या व्यक्तींचा फोन येत असून त्यातून दबाव आणण्यात येत आहे. याबाबत अजयसिंग राठोड या व्यक्तीशी संपर्क केला असता शिवशंकर पाटील यांच्या म्हणण्यानुसार मी फक्त स्वाक्षरी केली. मात्र बाकी मला यातले काहीही माहिती नाही असे स्पष्ट केले. मोहिते यांनी किती पैसे परत केले आणि किती करणार आहेत. याबाबत आपल्यासमोर कुठलाही व्यवहार झाला नसल्याचे राठोड यांनी स्पष्ट केले आहे.