आमदार किशोर जोरगेवार यांच्या संकल्पनेतुन चंद्रपूरात आयोजित होणार भव्य माता महाकाली महोत्सव
माता महाकाली भक्तांची बैठक संपन्न
दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
चंद्रपूरचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांच्या संकल्पनेतून नवरात्रीत चंद्रपूरची अराध्य दैवत माता महाकालीचा भव्य महोत्सव घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. महाकाली भक्त सदर महोत्सवाचे आयोजन करणार असुन काल महाकाली मंदीर सभागृहात माता महाकाली भक्तांची बैठक सपन्न झाली. यावेळी सदर महोत्सवाबाबत अनेक महत्वाच्या सुचना केल्या आहे.
चंद्रपूर जिल्ह्याला आणि पर्यायाने चंद्रपूरची आराध्य दैवत माता महाकाली मंदिराला पर्यटन दृष्टा महत्व प्राप्त करुन देण्यासाठी चंद्रपूरात भव्य माता महाकाली महोत्सवाचे आयोजन करण्याची संकल्पना आमदार किशोर जोरगेवार यांनी व्यक्त केली होती. सदर संकल्पना काल आयोजित बैठकीत त्यांनी माता महाकाली भक्तांसमोर ठेवली आहे. सदर महोत्सव नवरात्री उत्सवात माता महाकाली मंदिरच्या पटांगणात घेण्याचे नियोजित करण्यात आले आहे. यात माता महाकाली
पालखी नगर प्रदक्षिणा, जागरण, भजन महोत्सव, माताचे कथा वाचन, नवचंडी यज्ञ, कन्या भोजन यासह इतर धार्मीक कार्यक्रम घेण्याचे नियोजित करण्यात आले आहे. सदर महोत्सवा दरम्यान चंद्रपूर शहरात रोशनाई करणे, प्रत्येक मंदिरात पुजा हवन करणे, नगर प्रदक्षिणेत भजन मंडळे, लेझीम पथकांना आमंत्रीत करणे, भोजनदान करणे, माता महाकाली देवीची आरती चंद्रपूर शहरात ऐकू येणार अशी व्यवस्था करणे आदि सुचना महाकाली भक्तांनी केल्या असुन या सर्व सुचना मान्य करण्यात आल्या आहे. सदर भव्य नियोजनासाठी लवकरच माता महाकाली महोत्सव समीतीची स्थापना करण्यात येणार असुन सदर समीतीत महाकाली भक्तांचा समावेश करण्यात येणार असल्याचे आमदार किशोर जोरगेवार यांनी म्हटले आहे. यावेळी महाकाली मंदिरचे विश्वस्त सुनिल महाकाले, इतिहासकार अशोकसिंग ठाकुर, दामोधर सारडा, अॅड. विजय मोगरे, मधुसुदन रुंगठा, माजी नगर सेवक बलराम डोडाणी, रोटरी क्लबचे अध्यक्ष अजय जयसवाल, कुक्कु सहाणी, संदिप पोशट्टीवार, सोनी, दिलीप रामेडवार, राजेंद्र बनकर, मसादे महाराज, दिपक बेले, मिलिंद गंपावार, राजेंद्र गुंडावार, दशरतसिंग ठाकुर, देवानंद साखरकर, आशिष मंुधडा, बालमूकुंद पालिवार आदि गिरवेनी, विवेक मानिक, पवण कर्वा, सदानंद खत्र्री, संजय धारणे, दादाजी नंदनवार, राजविर यादव, धनंजय दानव, बाबला पुजारी, अनिल टहलियानी, राजु जोशी, विजय राजपुत, अजय कपुर, सुरेश बंडिवार, जितेश कुळमेथे यांच्यासह माता महाकाली भक्तांची मोठ्या संख्यने उपस्थिती होती.