विद्यार्थी घडवून समाजाला दिशा देण्याचे मोठे काम शिक्षकांचे - डी.के.आरीकरविद्यार्थी घडवून समाजाला दिशा देण्याचे मोठे काम शिक्षकांचे - डी.के.आरिकर

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :
५ सप्टेंबर रोजी पर्यावरण संवर्धन व विकास समिती चंद्रपूरच्या वतिने शिक्षक दिनाचे औचित्य साधुन शिक्षकांचे मनोधर्य, व उत्साह वाढविण्याचे हेतूने तीन शाळेच्या शिक्षकांचा शाल, सन्मान चिन्ह व सन्मान पत्र देवून तसेच शाळेच्या परिसरात वृक्षारोपण करून शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. विद्यार्थी घडवून समाजाला दिशा देण्याचे मोठे काम शिक्षकांच्या हातून घडत असते. समाजाचा आरसाच हा विद्यार्थी असतो. विद्यार्थी घडविण्याचे काम शिक्षक करतो. असे संस्थापक अध्यक्ष , दलित मित्र डी. के. आरिकर, यांनी यावेळी सांगितले. महिला अध्यक्षा वर्षा कोठेकर,राणी राव,प्रदिप अडकिन,प्रविण जुमडे,दिनेश एकवनकर, ओमप्रकाश एंगलवार, निशा धोंगडे,संक्षीप्ता शिंदे,ज्योती रामावार, रजना नागतोड, ज्योती मुळे,स्वाती दुर्गमवार, वैष्णवी कथ्थलकर ,दिशा कथ्थलकर यास व पर्यावरण संरक्षण समितीचे सदस्य उपस्थित होते.
जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा भटाळी येथे शाळेच्या शिक्षिका सौ. मालती काटकर, सौ. विशाखा शेंडे, कुमारी प्रणाली उपलंचीवार या शिक्षकांच्या वृक्ष देऊन सन्मान पर सत्कार करण्यात आला.
जिल्हा प्राथमिक शाळा पायली येथिल डिजिटल शाळा असून येथील विद्यार्थी शिक्षणाचे धडे कोरोना काळातही डिजिटल च्या माध्यमातून घेत होते.पायली येते आज शिक्षण दिनाच्या निमित्याने पर्यावरण संवर्धन व विकास समिती चंद्रपूर च्या वतीने येथील शिक्षका अंजलीना साळवे,शिक्षक निखिल तांबोळी, अंगणवाडी सेविका शरला खोंड, या शिक्षकांचा शाल, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. गट शिक्षण अधिकारी फुलझेले साहेब यांनी आपले अध्यक्षीय भाषणात म्हटले की, हा सत्कार खरंच अवलोकनिय असून समाजाला दिशा आणि भविष्य घडविण्याचे काम ज्या शिक्षकाच्या हातून होतात. त्यांचा सत्कार होणे आवश्यक आहे. या पर्यावरण संवर्धन समितीचे माध्यमातून होणे, आणि त्यातही एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहणे. मला वाटले की एक किंवा दोन सामाजिक कार्यकर्ते येऊन सत्कार करतील इथे पूर्ण पर्यावरण समितीस उपस्थित झाल्याचे आश्चर्य व्यक्त केले. एवढे मोठे महान कार्य या पर्यावरण समितीचे हाताने होत असेल तर आणि याच बरोबर पर्यावरणाचे संवर्धन होत असेल तर यापेक्षा दुसरे कार्य काय असू शकते. असे मनोगत त्यांनी व्यक्त केले.अंगणवाडी सेविका शरला खोंड,.वैशाली रत्नपारखी.,शाळा समितीच्या सदसस्या गावातील नागरीक  उपस्थित होते. . निखिल तांबोळी  म्हणाले की,अनपेक्षित मिळालेले सत्कार हे मनाला खूप आनंद देऊन जातात. ,यातच खूप मोठं समाधान असते.  जिल्हा परिषद शाळा.चिंचोली केंद पद्मापुर येथे  शिक्षक दिना निमित्य शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. मुख्यध्यापक  सदन मुनगेलवार, शिक्षक हेमचंदज डांगे या  शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. या शिक्षकांचे कार्यच नाहीतर  प्रयत्नाची पराकाष्टा करून  या गावात विद्याथ्र्यांना शिक्षणाचे धडे गिरवण्यासाठी धडपडत यावे लागते. चिंचोली या गावाला प्रशासनाच्या अशा सुविधा नसताना सुद्धा पावसाळ्यात तर चारही बाजूंनी  गाव पाण्याने वेढलेला असतो.   ऐवढेच नाहि तर जंगल   परिसर लागून असल्याने  जंगली हिंस्त्र पशुचा सामना करावा लागतो. जीव मुठीत घेऊन या शिक्षकांना लागन यावं लागतं. अशाही परिस्थितीत ते विद्याथ्र्यांना शिकवण्यासाठी येत असल्याची माहिती गावकर -यांनी दिली. चंद्रपूर तालुक्यातील जंगल परिसरात लागून असलेल्या  गावाकडे प्रशासनाचे  दुर्लक्ष होत . या  शिक्षकांचे शिक्षक दिनी  पर्यावरण संवर्धन व विकास समिती चंद्रपूरच्या वतीने सत्कार करण्यात आला. शाळेच्या  विद्याथ्र्यांकडून मान्यवराचा सत्कार करण्यात आला.