'गोमाता वन उद्यानाच्या ' (cow) निर्मितीसाठी राज्याच्या वन विभागाने पुढाकार घ्यावा- माजी खासदार नरेश पुगलीया naresh pugaliya




गोमाता वन उद्यानाच्या ' (cow) निर्मितीसाठी राज्याच्या वन विभागाने पुढाकार घ्यावा- माजी खासदार नरेश पुगलीया naresh pugaliya


दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर
महाराष्ट्र राज्याच्या वन विभागाने राज्यात असलेल्या दहा वर्षावरील गौरक्षण संस्था मध्ये शेकडो गायी (cow' s) अशा गौरक्षण संस्थांना महाराष्ट्र शासनाच्या वन विभागाने 100 एकर जमीन ही त्या गाईच्या संख्येनुसार त्या त्या क्षेत्रात गोपालनासाठी वन विभागाने द्यावी. जिल्ह्यातील पहिला राजुरा येथील वन उद्यान 2002 मध्ये सुरुवात करने केली. त्यानंतर आज जिल्ह्यात इतर रस्ता ठिकाणी वन विभागाने वन उद्याने तयार केली आहेत. मात्र जिल्ह्यात गोमाता वन उद्यान निर्मिती व्हावी यासाठी महाराष्ट्र राज्याच्या वन विभागाने पुढाकार घ्यावे अशी मागणी आज पत्रकार परिषदेतून माजी खासदार नरेश पुगलीया naresh pugaliya  यांनी केली आहे.

जिल्ह्यात गोमाता वन उद्यानाकरिता जबाबदारीने चालत असलेल्या गोरक्षण संस्थांना वनजमीन उपयोगाकरिता उपलब्ध करून दिल्यास गोमातांना लागणारा चारा, पाणी व स्वाश घेण्यास मोकळी जागा या उद्यानाच्या माध्यमातून उपलब्ध करून दिल्यास. त्या ठिकाणी झाडे व जमिनीला कुंपण केल्यावर त्या ठिकाणी सागवानासारखी मौल्यवान झाडे व वन उपजांची झाडे लावले जातील. त्यातून लाखोचा वन विभागाला महसूल तयार होईल. या झाडाची मालकी व जमिनीची मालकी ही वनखात्याचीच राहील. यासाठी वन विभागाने पडीत किंवा झुडपी जंगलाची जागा(D-Graded forest land) अशा जागेचा योग्य उपयोग होईल. व राज्यातील लाखो गोधनाला संरक्षण मिळेल त्याची उपजीविका उपासना होईल. व त्या गाईंच्या दुधाचा व मलमूत्रांचा योग्य उपयोग कंपोस्ट ची खतासाठी केला जाईल. राज्यात होणाऱ्या गो हत्या त्या होणार नाहीत. व त्या गोरक्षणातील गायांना चारापाणी योग्य मिळाल्याने त्यांची उपासमार व होणारा छळ थांबवता येईल. यासाठी महाराष्ट्राच्या वन विभागाने या विषयाकडे गांभीर्याने व सकारात्मक विचार करून राज्यातील गोमाता वन उद्यानाची निर्मिती करावी असे आवाहन पत्रकार परिषदेतून केले आहे.