जिल्हा परिषद वित्त, सामान्य, शिक्षक, बांधकाम या विभागातील प्रतिनियुक्तीचा घोळ कायमच! Jilaha parishad chandrapur
मुख्य कार्यपालन अधिकारी गांभीर्याने घेतील का?
दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-21/11 /2022
मागील दोन आठवड्यापासून वर्तमानपत्रात चंद्रपूर जिल्हा परिषद मधील बदल्या संदर्भाचा घोळ अजूनही कायम असून जिल्हा परिषदचे अधिकाऱी याकडे गांभीर्याने घेतील का? अशा प्रकारच्या वर्तमानपत्रातून बातमी पुरवली जात असताना सुद्धा ,का बरं! दुर्लक्ष केल्या जात आहे .अशी चर्चा जिल्ह्यात होत आहे. अनेक विभागातील कर्मचारी ,अधिकारी वर्षानुवर्ष एकाच टेबलवर कार्यरत असून आता हा विषय नवीन मुख्य कार्यपालन अधिकारी यांच्यासाठी संशोधनाचा झाला . अनेक वर्षापासून जिल्हा परिषद मध्ये हा घोळ सुरू आहे. मात्र कुठलाही अधिकारी कर्मचारी आपल्या टेबल पासून दूर जाण्यास तयार नाही. अंतर्गत बदल्याचा विषय असो, किंवा संबंधित विभागातील अदलाबदली असो हा विषय गांभीर्याने घ्यावं.( sabjekat)
असाच प्रकार सुरू असून आणखीन वित्त विभागातील पीयूष भांदककर सहायक लेखाधिकारी यांची सन 2021-22 मध्ये पंचायत समिती बल्लारपूर येथे बदली झाली. परंतु तिथे न जाता प्रतिनियुक्ती उमेद कार्यालय जिल्हा परिषद चंद्रपूर येथे करून घेतली .तदनंतर मुख्य कार्यकारी अधिकारी यांचेशी सलोख्याचे समदं साधून आयुक्त कार्यालय नागपूर यांचे कडे प्रस्ताव पाठवून चिरीमिरी देऊन तेथून हातोहात आदेश बांधकाम विभाग जिल्हा परिषद चंद्रपूर येथे बदली करून घेतली. विभागामध्ये सहायक लेखाधिकारी करिता पोटली दिली जाते. परंतु या कर्मचारी यांनी आयुक कार्यालय नागपूर येथून आज पर्यंत दोनदा प्रतिनियुक्ती करून घेतली. एकाच व्यक्ती ची दोनदा प्रतिनियुक्ती कशी होऊ शकते? या पूर्वी सुद्धा सदर कर्मचाऱ्यांची पंचायत समिती जिवती येथे बदली झाली होती. तेव्हा सुद्धा असाच प्रकार घडला होता. कर्मचारी प्रतिनियुक्तीचा प्रस्ताव जेव्हा मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे कडे प्रस्ताव सादर करतात तेव्हा प्रस्तावाची पडताळणी करायला पाहिजे की, सदर कर्मचारी नि कितीदा प्रस्ताव सादर केला गेला आहे .सदर प्रस्तावाची छाननी करून आयुक्त कार्यालयाला पाठवायला पाहिजे. परंतु तसे न होता चिरीमिरी देऊन पुढे पाठवितात. असा प्रकार सर्वात जिल्हा परिषद मध्ये सुरू आहे. यामुळे शासनाच्या सर्व धोरणाच्या आदेशाची पाय मल्ली होत आहे.
यामुळे पंचायत स्तरावरील कर्मचाऱ्यांना हक्कापासून दूर ठेवले जाते. पंचायत समिती स्तरावरील कार्यालयात कर्मचारी नसल्याने अधिक भार वाढत आहे. जिल्हा परिषद चे कर्मचारी शहरातून बाहेर जाण्यास हिचकीचतात.
सामान्य प्रशासन विभाग येथील सुनील जवळे कनिष्ठ प्रशासन अधिकारी हे गेल्या पंधरा वर्षापासून बदली होऊन सुद्धा आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे सीएसआयक म्हणून कार्यरत आहे. सध्या यांची बदली पंचायत समितीची चिमूर येथे कनिष्ठ प्रशासन अधिकारी म्हणून झालेली आहे. तरीसुद्धा हे स्वीय सहायक म्हणून मुख्य कार्यकारी यांच्याकडेच गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. तसेच नदीम कुरेशी कनिष्ठ सहाय्यक हे गेल्या पंधरा वर्षापासून मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे कडे स्वीय सहायक म्हणून कार्यरत आहे. यांची कितीदा तरी बदली पंचायत समितीला झालेली आहे .तरीसुद्धा हे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडेच कार्यरत राहतात .यांच्या शिवाय काम भागतच नाही का ? यापूर्वी सुद्धा काही वर्तमानपत्रांमध्ये बातमी प्रसिद्ध झाली होती. ही चर्चा संबंधित विभागात होत आहे. एकाच ठिकाणी बस्तान मानून बसल्यामुळे मुघल शाही सुरू असल्याची कर्मचारी चर्चा आहे.सध्या यांची बदली जिल्हा परिषद बांधकाम उप विभाग येथे झालेली आहे. तरीसुद्धा हे त्यांच्याकडे कार्यरत आहे. याना सुद्धा तेथून हलविण्यात यावे.
शिक्षण विभाग प्राथमिक येथील प्रवीण दातरकर कनिष्ठ लिपिक हे कुठेही बदली झाली तरी शिक्षण विभागात एकाच टेबल वर काम करताना दिसून येत आहे. अशी चर्चा आहे की हा लोणच्याचा टेबल असल्याने टेबल सोडण्यास तयार नाहीत. यांची बदली सिंचाई विभाग चंद्रपूर येथे होऊन आहे.
तसेच प्रवीण गिरडकर कनिष्ठ लिपिक यांची सुद्धा बदली पंचायत समिती राजुरा येथे झालेली आहे. यांनी सुदधा प्रतिनियुक्तीवर शिक्षण विभाग येथे ठाण मांडून बसलेले आहे. हे सुद्धा मुख्यालय सोडण्यास तयार नाही.
तूर्तास एवढेच!
.( पुढील भागात वाचा..... या विभागातील पोल खोल)