जिल्हा परिषद jilha parishad मधील कर्मचारी, अधिकारी यांच्या पदोन्नती,प्रतिनियुक्तीचा घोळ कायमच!



जिल्हा परिषद jilha parishad मधील कर्मचारी, अधिकारी यांच्या पदोन्नती,प्रतिनियुक्तीचा घोळ कायमच!

काहींनी जागा सोडल्याची चर्चा!

दिनचर्या न्युज :-

चंद्रपूर :दि. 28/11 /2022

चंद्रपूर जिल्हा परिषद येथील मागील तीन आठवड्यापासून जिल्हा परिषद विविध विभागातील प्रतिनियुक्तीच्या बदल्या संदर्भात दिनचर्या या वृत्तपत्राने मालिका सुरू केली आहे. जिल्हा परिषद मधील अंतर्गत बदल्या ,विभागीय बदल्या, पंचायत स्तरावरील झालेल्या बदल्या यासंदर्भात दिनचर्या वृत्तपत्राने वाचा फोडण्याचे काम केले आहे. परंतु निढाळ झालेले कर्मचारी, अधिकारी यांना अजूनही पाजर फुटलेला दिसत नाही. mukhay karykari adhikari

जिल्हा परिषदेतील मुख्य कार्यकारी अधिकारी गांभीर्याने घेतील का? हा प्रश्न विचारला असताना सुद्धा अनेक विभागातील कर्मचारी अजूनही आपल्याच पारंपरिक वरदस्त असलेल्या टेबलवर कार्यरत आहेत. अनेक वर्षापासून एकाच टेबलवर असल्यामुळे जिल्हा परिषद मध्ये भोंगळ कारभार होत असल्याचे संबंधित कर्मचाऱ्यांमध्ये चर्चा आहे. त्यामुळेच जिल्हा परिषद च्या मुख्य तिजोरीलाच चुना लावल्या जात असल्याची चर्चा ही होत आहे. यातील मुख्य विषय गांभीर्याने घेऊन मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी संबंधित विभागातील अनेक वर्षापासून असलेल्या कर्मचारी, अधिकारी यांची प्रतिनियुक्ती करावी.   संबंधितांच्या झालेल्या   नियुक्ती त्या त्या पंचायत समिती सरावर  पाठवण्यात यावं.! 


पदोन्नती करिता तारीख पे तारीख!

पदोन्नती म्हटले की, कर्मचाऱ्याच्या आनंदाची गोष्ट  असते.
परंतु चंद्रपूर जिल्हा परिषद मध्ये गेले कित्येक दिवसापासून पदोन्नती ची तारीख लांबणीवर जात आहे. या मागे काय कारण आहे हे मात्र दिसून येत नाही. पदोन्नती ची सभा दिनांक 10 नोव्हेंबर 2022 ला ठरण्यात आली होती. परंतु काही कारणास्तव 25 नोव्हेंबर 2022 ठरली गेली. ही  सुद्धा  तारीख लांबल्याने कर्मचाऱ्या मध्ये नाराजी पसरली आहे.  काही कर्मचारी या महिन्यात सेवानिवृत्त सुद्धा होत आहे. त्यांचे आर्थिक नुकसान होत आहे .पदोन्नती सभा या महिन्यात तरी होणार काय? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
     यातील  वित्त विभागात असलेले इमरान सय्यद कनिष्ठ लेखा अधिकारी, प्रशांत घोरसारीया  ज्येष्ठ सहाय्यक, अमित घोरसारीया कनिष्ठ लेखा अधिकारी, अमित काकडे ज्येष्ठ  सहाय्यक लेखा, बंडू कुंभारे ज्येष्ठ  सहाय्यक लेखा,चंद्रशेखर सोरते कनिष्ठ सहाय्यक लेखा, प्रवीण दलाल कनिष्ठ लेखा अधिकारी,  मेलविन रायपुरे ज्येष्ठ  सहाय्यक लेखा, सुरेंद्र चापडे कनिष्ठ सहाय्यक लेखा, श्रीमती रीमा  सोरते कनिष्ठ सहाय्यक लेखा, धीरज पोटवार कनिष्ठ सहाय्यक, सचिन किनाके वरिष्ठ लिपिक, शितल बोरगमवार वरिष्ठ लिपिक, पियुष  भांदककर  सहाय्यक लेखा अधिकारी, सुनील जवळे कनिष्ठ प्रशासन अधिकारी, नदीम कुरेशी कनिष्ठ सहाय्यक, प्रवीण दातारकर कनिष्ठ लिपिक,  प्रवीण गिरडकर कनिष्ठ लिपिक, या सर्वांच्या   बदल्यांचा प्रश्न अनेक वर्षांपासून जिल्हा परिषद मधील वित्त, सामान्य, शिक्षक, बांधकाम या विभागातील  प्रतिनियुक्तीचा घोळ कायमच आहे.
झेडपीचे (zdp) पुन्हा काही कर्मचारी, अधिकाऱ्यांनी प्रतिनियुक्तीच्या बदलीसाठी नागपूर येथील आयुक्त कार्यालयात अर्ज केल्याची चर्चा सुरू आहे. जिल्हा परिषद मध्ये असाच  बदलीचा घोळ होत राहिला तर पंचायत स्तरावरील अनेक वर्षापासून कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांचे काय? असा प्रश्न जिल्ह्यातील संबंधित कर्मचाऱ्यांना भेडसावत आहे.

शासनाच्या नियमाची पायमल्ली होत असून, सर्व नियम धाब्यावर बसवून जिल्हा परिषदत भोंगळ कारभार सुरू आहे. या भोंगळ कारभाराची  राज्य विभागीय आयुक्त,तसेच राज्य सरकारने दखल घ्यावी. 

मागील आठवड्यात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन यांना संबंधित माहिती बाबत विचारणा केली होती. या  विषयाच्यासंदर्भातली मी पुर्ण माहिती बघितली असून लवकरच  त्याच त्या संदर्भातील विभागाला माहिती मागविली आहे. व तशी आपणास माहिती सुद्धा दिली जाईल असे त्यांनी दिनचर्याशी बोलताना सांगितले होते.

मात्र एक आठवड्यानंतर  कर्मचारी ,अधिकाऱ्यांच्या त्यातील काही कर्मचाऱ्यांच्या  प्रतिनियुक्त्या  झाल्या असल्याची  चर्चा झेडपी सुरू आहे. काही कर्मचारी मात्र अजूनही  बस्तान  मांडून  आपल्या टेबलवर बसले आहेत. त्यांनाही मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी त्यांच्या टेबलाचीं अदला बदली करावी अशी मागणी होत आहे.

तूर्तास एवढेच! क्रमशः
(पुढील भागात वाचा जिल्हा परिषदेतील या भागाची पोलखोल)