निरोगी आरोग्यासाठी लक्षणे दिसतात रोगाचे निदान करा.. भाजपा जिल्हाध्यक्ष भोंगळे यांचे प्रतिपादन




निरोगी आरोग्यासाठी लक्षणे दिसतात रोगाचे निदान करा..
भाजपा जिल्हाध्यक्ष भोंगळे यांचे प्रतिपादन


दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
आपल्याला होणारा आजार एकाएक बळावत नाही.त्याची लक्षणे असतात.परंतू आपले त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असते.परिणामी कालांतराने आपण आजारी पडतो.लक्षणे दिसतात रोगाचे निदान झाले तर त्यावर विजय मिळविला येऊ शकतो,म्हणून नागरिकांनी निरोगी आरोग्यसाठी लक्षणे दिसताच निदान केले पाहिजे असे प्रतिपादन भाजपा जिल्हाध्यक्ष(ग्रा)देवराव भोंगळे यांनी केले.ते भाजयुमो महासचिव प्रमोद क्षीरसागर यांच्या जन्मदिनानिमित्य क्षीरसागर परिवार तर्फे सपना टॉकीज परिसरात 14 डिसेंबरला आयोजित रोगनिदान व उपचार शिबिराच्या उदघाटन प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष व उद्घाटक म्हणून बोलत होते.
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून माजी उपमहापौर राहुल पावडे,माजी नगरसेवक छबू वैरागडे शीतल आत्राम,राहुल घोटेकर, रवी गुरनुले,रवी जोगी, सुनील डोंगरे, चांद सय्यद, मनोज पोतराजे, आकाश ठुसे, अक्षय शेंडे, रंजन ठाकूर, संजय पटले, आकाश हटवार, सुमित श्रीराम राजखोडे, अतुल चिंचोलकर, आतीश हटवार, अमर दुर्गंज,अर्जुन आकाश ठाकूर, कुसुम कडुकर, योगेश गायकवाड,प्रफुल बोदाने यांची उपस्थिती होती.
भोंगळे म्हणाले,जन्मदिनाला आरोग्य शिबिराचे आयोजन करून प्रमोद क्षीरसागर यांनी एक आदर्श निर्माण केला आहे.राहुल पावडे यांच्या मार्गदर्शनातील या शिबिराला सावंगी मेघे येथील तज्ञ डॉक्टर मंडळींना पाचारण करण्यात आले,याचे त्यांनी कौतुक केले.समाजातील शेवटच्या माणसाची सेवा करणे हेच भाजपा व भाजयुमोचे धोरण असल्याचे त्यांनी सांगितले.
या भव्य आरोग्य शिबिराचा हजारो लोकांनी लाभ घेतला.
याप्रसंगी बोलताना राहुल पावडे म्हणाले,आर्थिक परिस्थितीमुळे लोकं आजाराकडे दुर्लक्ष करतात.त्याचे गंभीर परिणाम परिवाराला भोगावे लागतात.आरोग्याबाबत निष्काळजीपणा योग्य नसून आरोग्य शिबिराचा लाभ सर्वांनी घ्यायला हवा.यासाठी युवकांनी जनतेला प्रोत्साहित करावे,असे आवाहन त्यांनी भाजयुमोच्या पदाधिकाऱ्यांना उद्देशून केले.दुर्धर आजार असणाऱ्या रुग्णांना पुढील उपचारासाठी सावंगी मेघे येथे पाठविण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

दिनचर्या न्युज