चंद्रपुरात बीसीसीआयची क्रिकेट अकॅडमी होणारपालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची घोषणा
जिल्हा क्रीडा संकुलातील सिंथेटिक ट्रॅकच्या लोकार्पण सोहळ्यात पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची घोषणा
माजी उपमहापौर राहुल पावडे यांनी केली होती मागणी
दिनचर्या न्युज :-२७/१२/२०२२
चंद्रपूर :-चंद्रपूर जिल्ह्यातील तरुणांना खेळात नैपुण्य प्राप्त करण्याच्या मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध व्हाव्यात, बौद्धिक क्षमतेबरोबरच शारीरिक क्षमता साधता यावी, तसेच क्रीडा क्षेत्रात आपले नावलौकिक प्राप्त करता यावे, यासाठी सर्व सोयी सुविधायुक्त क्रीडांगणाची निर्मिती करण्यात आली आहे. याची फलश्रुती म्हणून जिल्ह्याचा गौरव वाढविण्यासाठी क्रीडा संकुलाच्या माध्यमातून जिल्ह्यात आतरराष्ट्रीय खेळाडू निर्माण व्हावेत, अशी अपेक्षा व्यक्त करीत पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपुरात लवकरच बीसीसीआयची क्रिकेट अॅकॅडमी निर्माण करण्याचे काम हाती घेण्यात येणार असल्याची घोषणा केली.चंद्रपूर येथे बी.सी.सी.आय. क्रिकेट अकादमी सुरू करण्याची मागणी माजी उपमहापौर राहुल पावडे यांनी जिल्हा क्रीडा संकुल येथील कार्यक्रमात केली होती.
या मागणीला दाद देवून लोकनेते विकासपुरुष ना. सुधीर मुनगंटीवार त्यावर चंद्रपुरात सुद्धा बी.सी.सी.आय. ची क्रिकेट अकादमी करनार असल्याची ग्वाही दिली. त्यासाठी त्यांचे मित्र मुंबईचे आमदार आशीष शेलार यांच्याशी ना. मुनगंटीवार यांनी चर्चा केली आहे.चंद्रपुरात सुद्धा आता आंतरराष्ट्रीय स्तराचे क्रिकेट पटू तयार होणार अश्या प्रकारचा आशावाद राहुल पावडे यांनी यानिमित्ताने व्यक्त केला.