महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिनानिमित्त सुरक्षा सप्ताहाचे विशाल जनजागरण !

महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिनानिमित्त सुरक्षा सप्ताहाचे विशाल जनजागरण !

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-३/१/२०२३
महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिनानिमित्त वाहतूक शाखा चंद्रपूर व प्रादेशिक परिवहन विभाग चंद्रपूर यांच्यातर्फे वाहतूक, रस्ता सुरक्षा रॅलीचे विशाल जनजागरण करण्यात आले . वाहतूक शाखेतून पोलीस निरीक्षक प्रवीण पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत .चंद्रपूर महानगरपालिकेचे आयुक्त विपिनजी पालीवार यांच्या अध्यक्ष खाली वाहतूक सुरक्षा सप्ताचे सुरुवात हिरवी झेंडी दाखवून करण्यात आली. विविध शाळेतून आलेल्या एनसीसी , आर एस पी, विद्यार्थ्यांच्या विराट रॅलीला चंद्रपूर शहरातील मुख्य मार्गावर सुरक्षा, वाहतुकीचे नियम, गाडी चालवताना मोबाईलवर बोलणे   टाळा, अशा प्रकारचे नारे देत विद्यार्थ्यांनी सुरक्षा  सप्ताहाची  रॅली काढली.  यावेळी मुख्यतः चंद्रपूर बचाव संघर्ष समितीचे सभी सक्रिय सदस्य आणि कार्यकर्ते, विविध शाळेच्या विद्यार्थी ,विद्यार्थिनी, शिक्षक यांचा सहभाग असून वाहतूक शाखेच्या पोलिसांनी यात सहभाग नोंदविला होता. 
 ही रॅली वाहतूक कार्यालयातूून निघून बँड पथकाच्या साह्याने वाजत गाजत चंद्रपूर शहरातून मुख्यमार्गाहून परत पुन्हा वाहतूक शाखेत समापन करण्यात आले. शाळेतील विद्यार्थ्यांना मिठाई व नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली  होती. या सर्व कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक प्रवीण पाटील यांनी केले.