सावलहीरा येथील कोतवाल भरती करा :- नितेश महागोकार






सावलहीरा येथील कोतवाल भरती करा :- नितेश महागोकार

दिनचर्या न्युज :-
कोरपना :-
गाव पातळीवरील महसूल प्रशासनचा महत्त्वाचा दुवा असणारे कार्यालय साजा ला ओळखल्या जाते. शेतकऱ्याचे अनेक कामे या कार्यालयतून होत असते. सोबतच शेत सर्वे, इतरही सर्वेक्षण होत असल्याने वेळोवेळी नागरिक या कार्यालयात चकरा मारत असतात परंतू सावलहिरा येथील साजा कार्यालयात अनेक वर्षा पासून कोतवाल पद रिक्त असल्याने शेतकऱ्याचे कामे खोळंबली असल्याचे दिसून येत आहे. कोतवाल हा तलठ्याचा त्याचा खरा हातखंडा असतो. तलाठी कार्यालयात नसताना सर्व प्रकारची कामे कोतवाल बघत असतो त्यामुळे कार्यालय कोतवाल याचा वर निर्भर असते परंतू कोतवाल नसल्याने साजा मध्ये येणाऱ्या नागरिकांची हेळसांड होताना दिसत आहे त्यामुळे कोतवालाची तात्काळ नेमणूक करावी अशी मागणी युवा सेना उप तालुका प्रमुख नितेश महागोकार,प्रदीप निरंजने , गजानन सुरपाम ,आयुष पठाण ,साईनाथ तुकाराम सुरज डावले
यांनी मागणी केली आहे.