पक्षीमित्र संमेलनातून जीवसृष्टी आणि पर्यावरणाच्या रक्षणासाठी कृती आराखडा तयार व्हावा- वन, सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार




पक्षीमित्र संमेलनातून जीवसृष्टी आणि पर्यावरणाच्या रक्षणासाठी कृती आराखडा तयार व्हावा,
वन, सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
देशात 2000 पासून ते 2022 पर्यंत पर्यावरणाचा संतुलनात झालेला बदल, या 22 वर्षेपर्यंत प्रत्येक कुटुंबात कॅन्सर सारख्या घातक आजाराने प्रवेश केला .असा एखादा व्यक्ती सांगा की ज्याच्या कुटुंबात जवळचा किंवा दूरचा ह्या आजाराने ग्रस्त असलेला किंवा बरा झालेला व्यक्ती नसेलच असे नाही.
टाटा कॅन्सर रिसर्च सेंटरचे डॉक्टर शर्मा त्यांच्या रिसर्च वरून , की टेक्नॉलॉजी पुढे गेली, ते म्हणाले तो एक भाग असावा पण मोठा भाग पर्यावरणात होणाऱ्या बदलाचा आहे. पर्यावरण पक्षांनाही निसर्गाच्या हालचालीचे संतुलन समजते परंतु मानवाला कळत नाही.
पक्षाच्या संदर्भामध्ये एक मनात तुम्ही विचार करा की, ,साधा तुम्हाला निसर्गाच्या संदर्भामध्ये जी माहिती देतात ते तर पीएचडी रिसर्च केल्यानंतर माणसेही देण्यामध्ये कमी पडतात. मात्र, मी मनात विचार केला इतका मोठा भूकंप होणार आहे हे समजलं नाही. पण पशुपक्ष्यांना मात्र हे समजत . आता मनुष्य मोठा की पक्षी मोठे म्हणून पक्षाचं संगोपन करणे तेवढेच संवर्धनाचे काम आहे. असे प्रतिपादन राज्याचे वने व सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार वन अकादमी येथे आयोजित 35 व्या महाराष्ट्र पक्षी मित्र संमेलन कार्यक्रमात बोलत होते. आज संपूर्ण जग ग्लोबल वार्मिंगचा सामना करीत आहे.
डायनोसॉर सारखे फक्त आणि फक्त कथेत चित्रात किंवा एखाद्या चित्रपटाचे विषय म्हणून राहतील. पण आपल्याला गिधाड कसा होता किती प्रकारचे गिधाड या देशात होते हे मात्र आपल्याला दाखवता येणार नाही. फक्त सांगता येईल आता दुर्मिळ प्रजातीमध्ये होते.

- पक्षी असो की प्राणी हे अन्नसाखळीतील घटक आहेत. ते तुटले तर जगणं कठीण होईल. त्यामुळे जीवसृष्टी आणि पर्यावरणाच्या रक्षणासाठी कृती आराखडा तयार व्हावा, भविष्याचा वेध घेण्यासाठी या संमेलनातून निघणाऱ्या निष्कर्यातून सरकार काम करेल, पक्षीमित्र संमेलनातील चिंतन हे मनापासून वनापर्यंत पोहोचवू, अशी ग्वाही वन, सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

महाराष्ट्र पक्षिमित्र संयोजित, इको प्रो संस्था आयोजित व ताडोबा- अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या सहकार्याने वन अकादमी येथे आयोजित 35 व्या पक्षिमित्र संमेलनाच्या उदघाटनप्रसंगी ते बोलत होते. मान्यवरांच्या हस्ते वटवृक्ष आणि दीप प्रज्वलन करून उदघाटन झाले. यावेळी स्वागताध्यक्ष आमदार किशोर जोरगेवार, संमेलनाध्यक्ष राजकमल जोब, वन प्रबोधिनीचे क्षेत्र संचालक श्रीनिवास रेड्डी, चंद्रपूर वनवृत्ताचे मुख्य वनसंरक्षक प्रकाश लोणकर, ताडोबाचे क्षेत्र संचालक डॉ. जितेंद्र रामगावकर, उपविभागीय अधिकारी श्री. मुरुगानंथन, महाराष्ट्र पक्षीमित्र संस्थेचे अध्यक्ष प्रा. डॉ. जयंत वडतकर, माजी संमेलनाध्यक्ष डॉ. निनाद शाह, ग्रीन प्लॅनेटचे अध्यक्ष सुरेश चोपणे यांची उपस्थिती होती. प्रास्ताविक आयोजक इको प्रो संस्थेचे अध्यक्ष बंडू धोतरे यांनी केले.

. त्यासाठी शासनाने भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात सर्रास पक्षाचे संवर्धन करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी अनुदान देण्याची घोषणा करण्यात आली. सारस पक्ष्यासाठी ६२ कोटीची योजना आखण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. ताडोबा- अंधारी प्रकल्पात पक्ष्याचे चित्र प्रदर्शन भरविण्यात यावे, त्याची माहिती क्यू आर कोड पद्धतीने देण्यात यावी, महाराष्टाव्यापी छायाचित्र पुरस्कार योजना घेण्याची सूचना मुनगंटीवार यांनी दिली.

स्वागताध्यक्ष आमदार किशोर जोरगेवार यांनी सांगितले की, पक्ष्याचा किलबिलाट पुन्हा ऐकू यावा यासाठी जनतेच्या सहभागातून, पक्षीमित्रांच्या अभ्यासातून आणि प्रशासनाचा सहकार्यातून प्रयत्न झाले पाहिजे . चंद्रपुरात वाघांचे संवर्धन मोठ्या प्रमाणात होते. आता चंद्रपूर बर्ड कॅपिटल व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.

संमेलन अध्यक्ष राजकमल जोब म्हणाले, बहूतेक पक्षीमित्रांचे पक्षी निरीक्षण जलाशयांवरील पाणपक्षी गणने पासून सुरु झालेले आहे. हिवाळ्यात महाराष्ट्रात विविध ठिकाणी असलेल्या जलाशयांवर येणा-या स्थलांतरित पाणपक्ष्यांची गणना हा उपक्रम आजदेखील महाराष्ट्र पक्षीमित्र संघटने कडे नवीन पक्षी निरीक्षकांना आकृष्ट करु शकतो. महाराष्ट्र पक्षीमित्र संघटनेने या उपक्रमाला अधिक चालना देण्याची गरज आहे, अशी अपेक्षा व्यक्त केली.


यावेळी महाराष्ट्र पक्षीमित्र संस्थेचे प्रा. डॉ. जयंत वडतकर यांनी भूमिका मांडली. माजी संमेलनाध्यक्ष डॉ. निनाद शाह यांनी नवे संमेलन अध्यक्ष राजकमल जोब यांना महाराष्ट्र पक्षीमित्र संमेलनांचे ध्वज हस्तांतरित केले.मान्यवरांच्या हस्ते 35 व्या पक्षिमित्र संमेलनाची स्मरणिका प्रकाशित करण्यात आले. तसेच प्रफुल सावरकर यांच्या निसर्ग संवाद, किशोर मोरे यांचे शबल, रवी पाठेकर यांचे अर्थवन, तर दीपक गुढेकर यांच्या पक्षीवेध पुस्तकाचे प्रकाशन झाले.
त्यानंतर महाराष्ट्र पक्षीमित्र आणि होप संस्थेच्या वतीने दिल्या जाणाऱ्या पक्षीमित्र पुरस्कार २०२२ वितरण करण्यात आले. यात जीवनगौरव पुरस्कार भीमा शंकर कुलकर्णी, पक्षीमित्र व संशोधन पुरस्कार प्रा. डॉ. जयवर्धन बालखंडे, श्रुशूषा पुरस्कार राजकुमार कोळी, पक्षी जनजागृती पुरस्कार अनंत पाटील, उदयमुख पक्षीमित्र पुरस्कार कुमारी अमृता आघाव आणि कुमारी यशश्री उपरीकर यांना देण्यात आला. या कार्यक्रमाचे संचालन प्रज्ञा नंदराज यांनी केले.

आता यापुढेही अनेक अशा जाती धोक्यामध्ये आहे.फुलपाखरू, मधमाशा सारख्या छोट्याशा, कीटकांपर्यंत सर्वांचे महत्व तेवढेच आहेत.
पशुपक्षात नर जरी गेला तरी मादी आपला जीव सोडते. एवढे घनिष्ठ प्रेम पक्षात असते. मानवाचे तसे नाही दुर्दैवाने आपणास यांच्या उन्नतीसाठी, संरक्षणासाठी ,संवर्धनासाठी आपणच कमी पडतो.
हवामान खात्याला ही, कळणार नाही असे अंदाज या पक्षांना असते. ते ऋतूनुसार आपल्या घरट्यांची बांधणी करतात.
एखादा फोटो काढायचा असेल तर, त्या ठिकाणी चार चार पाच तास एकाग्रतेने बसावे लागते.
तेव्हा कुठे एखादा सुंदर फोटो जन्माला येतो.
जेव्हा रात्री वेळ मिळतो तेव्हा युट्युब वर मी पक्षांच्या संदर्भातले व्हिडिओ मी पाहते.असे मुनगंटीवार म्हणाले.
यासंदर्भातले पक्षी फोटोग्राफ आहे मेहनत करतात त्या सर्वांना या फोटोंना एक्झिट करता येईल .मुंबईला कार्यक्रम घ्या आणि बक्षीसही मोठा द्या !
अन्य त्याची मजा असणार आणि तुम्हाला पाहिजे असेल तर स्पॉन्सरशिप मी शोधून देहू,अनेक अशा कंपन्या यामध्ये स्पॉन्सरशिप घेऊन येतात.
गोंडवाना विद्यापीठ पण युनिव्हर्सिटी चा दर्जा देण्याच्या दृष्टीने एक विधेयक सुद्धा करता. जुलैमध्ये गोंडवाना विद्यापीठ हे फॉरेस्ट अँड ट्रायबल युनिव्हर्सिटी फॉरेस्ट रिसर्च सेंटर सुद्धा यामध्ये व्हावं आणि याच गोंडवाना विद्यापीठाच्या माध्यमातून जगामध्ये जे पर्यावरणाचे हितचिंतक
आहे त्यांच्यापर्यंत संदेश जावा. चंद्रपूर जिल्ह्यातील सागवान अयोध्येच्या मंदिरासाठीही लागणार आहे. जिल्ह्यामध्ये सध्या 203 वाघाची संख्या आहे.
 ज्या चंद्रपूरचं नाव लोकपुर होत आणि इथंच चंद्रपूरचा महत्व थांबत नाही आपणही आता मे महिन्यात जेव्हा एनडीटीव्ही ,आज तक बघाल तेव्हा एक गोष्ट तुमच्या लक्षात येईल की ,तीन चार दिवस तरी कमीत कमी बातम्या येतात की जगात ही सर्वात जास्त   उष्णता असणारा जिल्हा चंद्रपूर आणि जिथे सर्वात जास्त गर्मी असते. उष्णता असते शुद्ध करण्याचं काम उष्णता करते .शुद्धता ही चंद्रपूर मध्ये आहे. मग ती चंद्रपूरची वैचारिक शुद्धता असो की पर्यावरणाची शुद्धता असो, या शुद्ध वातावरणात आपलं मंथन चिंतन यशस्वी वापर आणि या चिंतनातून आपण या राज्यांमध्ये या क्षेत्रामध्ये एक प्रगतीच पाऊल  पुढे न्यावं  एवढी इच्छा व्यक्त करतो . तुमच्या मंथनातून तुमच्या अभ्यासातून तुमच्या इच्छापूर्ती आणि पर्यावरणाच्या संरक्षणासाठी कार्य करेल हा विश्वास देतो .