चिमूरचे भाजप आमदार कीर्तीकुमार भांगडियावर विनयभंगाचा गुन्हा दाखल chandrapur



चिमूरचे भाजप आमदार कीर्तीकुमार भांगडियावर विनयभंगाचा गुन्हा दाखल

दिनचर्या न्युज :-  
चिमूर : -
आमदार किर्तीकुमार उर्फ बंटी भांगडियासह त्यांच्या कार्यकर्त्यांवर चिमूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल.
आमदारांना कार्यकर्त्यांना घेऊन घरात घूसून हल्ला करणे भोवले.
- साईनाथ उर्फ अश्वमेघ तुकाराम बुटके यांच्यावर भांदवी २९४ कलमातंर्गत गुन्हा दाखल झाला.
चिमूर विधानसभा निर्वाचन क्षेत्राचे आमदार किर्तीकुमार उर्फ बंटी भांगडिया यांच्या बाबतीत अश्लील शब्दातंर्गत मजकूर सोशल मीडियावर साईनाथ उर्फ अश्वमेघ तुकाराम बुटके यांनी वायरल केले.
परिणामतः आमदार बंटी भांगडियासह त्यांचे शेकडो कार्यकर्ते,साईनाथ बुटके यांच्या मजूकूरावर नाराजी अंतर्गत चिडले व भडकले.साईनाथ उर्फ अश्वमेघ तुकाराम बुटके यांच्या द्वारा सदर सोशल मीडियावर वायरल मजूकूराचा परिणाम असा झाला कि नाराजी अंतर्गत रागाच्या भरात आमदार बंटी भांगडिया हे आपल्या शेकडो कार्यकर्त्यांना सोबत घेऊन साईनाथ बुटके यांच्या चिमूर येथील राहत्या घरी गेले व त्यांच्यावर हल्ला करून मारहाण केली.शेकडोच्या जमावात हा प्रकार घडला यानंतर साईनाथ बुटके यांच्यावर कारवाई करण्यात यावी म्हणून आमदार आणि त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यांनी पोलिस स्टेशन चिमूर येथे ठिय्या आंदोलन केले.आमदार बंटी भांगडिया व साईनाथ उर्फ अश्वमेध तुकाराम बुटके यांनी एकमेकांच्या विरोधात पोलीस स्टेशन चिमूर येथे तक्रारी दाखल झाल्या.व दोन्ही पक्षावर गुन्हे नोंद करण्यात आले.आमदार बंटी भांगडिया यांच्या तक्रारीवरून साईनाथ बुटके यांच्यावर अश्लील शिवीगाळ करणे संबंधाने संगणकीय प्राताधिकार भंग गुन्ह्याबरोबर भांदवी २९४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला .
तर अतात्विक गुन्हेगार प्रवृत्तीचे लोक गोळा करून घरात घुसून हल्ला करणे संबंधाने आमदार बंटी उर्फ किर्तीकुमार भांगडिया यांच्यासह त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यांवर भादवी कलम १४३,१४७,१४९,४५२,३२३,३५४,२९४ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र,एकमेकांवर गुन्हा दाखल करण्यासंबंधाचा राडा रात्रो २ ते ३ वाजता पर्यंत चालला.या राडा व हल्ला प्रकरणामुळे चिमूर वासियात भीतीयुक्त हालचलीचे वातावरण निर्माण झाले असून,चिमूर वासीय रात्रोच्या घटनाक्रमाकडे बारीक नजर ठेवून आहेत.
चिमूरचे उपविभागीय पोलिस अधिकारी आशिष नोपाणी, ठाणेदार मनोज गभणे सदर घटनाक्रमातंर्गत बारकाईने लक्ष केंद्रित करून चौकशी करीत आहेत.आमदार बंटी भांगडिया हे भाजपा पक्षाचे आहेत तर साईनाथ बुटके यांचा कुठल्याही पक्षासोबत संबंध नाही.मात्र त्यांचे भाऊ गजानन बुटके हे काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी असून माजी जिल्हा परिषद सदस्य आहेत. तद्वतच ते माजी कॅबिनेट मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री,आमदार विजयभाऊ वडेट्टीवार यांचे खंदे समर्थक आहेत.या प्रकरणात अजून पर्यंत कुणालाही अटक करण्यात आली नसून पुढील तपास सुरु आहे.