... या विभागाच्या अधिकाऱ्यांची होणार राज्यस्तरीय
चौकशी!
दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
चंद्रपूर पाटबंधारे विभाग चंद्रपूर येथे कार्यकारी अभियंते सा.बा. काळे यांच्यासह उपविभागीय अभियंता सय्यद समीर यांच्या भ्रष्टाचाराची व त्यांच्या खाजगी संपत्तीची सीबीआय चौकशी करून कारवाई करण्यात यावी याबाबतची तक्रार राज्याचे मुख्यमंत्री यांना देण्यात आली असून. त्यांच्याकडून चौकशी होणार असल्याचे पत्र तक्रारदाराला प्राप्त झाले आहे.
पाटबंधारे विभागात अनेक भ्रष्टाचाराचे प्रकरण समोर येत असून काही दिवसा अगोदरच, चंद्रपूर येथील जलसंपदा विभागातील अधिकारी आणि कंत्राटदार यांच्या संगमताने भ्रष्टाचार सुरू असल्याचे प्रकरण उघडकीस आले होते जलसंधारण विभागातील प्रभारी कार्यकारी अभियंता श्रावण शेंडे हे एका कंत्राट दाराकडून 50 लाख रुपयाची लाच घेण्याच्या प्रकरणात अडकले. त्याच प्रकारचे प्रकरण चंद्रपूर पाटबंधारे विभागात कार्यकारी अभियंता काळे यांनी आपल्या अधिकाराचा गैरवापर करून कंत्राटदाराला संगम साधून स्वतःचीच कंत्राटदारी सुरू केल्याची चर्चा सुरू आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना तालुक्यात अमरनाला धरणाचे सौंदर्यीकरण इतर कामे रेड्डी यांच्या वेंकटेश्वरा कन्ट्रक्शन कंपनीला या रजिस्टरवर आहे. त्यांनी स्वतःच्या मुलागा आतुतोष काळे याला कामे देऊन स्वतःच करून घेत असल्याची चर्चा सुरू आहे. विभागात इतर भागीदार म्हणून कित्येक वर्षापासून शाखा अभियंता म्हणून कार्यरत असलेले आणि आता सध्या चंद्रपूर पाटबंधारे उपविभाग अभियंता म्हणून वरती झालेले उपविभागीय अभियंता सय्यद समीर यांचाही समावेश असल्याची चर्चा आहे. काळे आणि सय्यद यांच्या मिली भगत , सर्वेसर्वो असल्यामुळे यांच्या अधिकार क्षेत्रात झालेल्या कामाची सखोल चौकशी करण्याची मागणी जोर धरत आहे.
याच मुख्य कार्यकारी अभियंता हे काही महिन्यापूर्वीच जिल्ह्यात शेती खरेदी केली असल्याची सध्या कुजबुज आहे. त्यांच्या खाजगी संपत्तीची चौकशी आल्यास मोठे गबाळ बाहेर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. म्हणून या संपूर्ण भ्रष्टाचाराची चौकशी राज्यस्तरीय होत असल्याचे पत्र प्राप्त झाले आहे.