छत्रपतींच्या महाराष्ट्रातील काष्ठ अयोध्येच्या श्रीराम मंदिरासाठी,काष्ठपूजन व भव्य शोभायात्रेत सामील व्हा-ना. सुधीर मुनगंटीवार






छत्रपतींच्या महाराष्ट्रातील काष्ठ अयोध्येच्या श्रीराम मंदिरासाठी,काष्ठपूजन व भव्य शोभायात्रेत सामील व्हा-ना. सुधीर मुनगंटीवार





दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
अयोध्येच्या राम मंदिरासाठी लागणारे लाकूड हे चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यातून जात असल्याने त्याचे विधिवत काष्ठपूजन उद्या 29 मार्च रोजी होत असून त्या लाकडाची पहिली फेरी उद्या निघणार आहे. यासाठी बल्लारपूर आणि चंद्रपूर शहरातून शोभायात्रा आणि काष्ठपूजन केल्यानंतर
जिल्ह्यातील सागवान रवाना होणार आहे. आज पत्रकार परिषदेतून महाराष्ट्राचे वने व सांस्कृतिक कार्यमंत्री , जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार सुधीर मुनगंटीवार पत्रकारांना संबोधित करताना म्हणाले की,
मी स्वतः एक कारसेवक म्हणून 6 डिसेंबर 1992 ला आयोध्या मध्ये गेलो होतो. मला अजूनही आठवतं की सकाळी सहा वाजता त्या विवादित स्थानावर लाखो कार सेवक जमा झाले.तो प्रसंगही मी पहला.
त्यावेळी आक्रमणकारी मोघलांच्या हे लक्षात आलं. या देशाला तलवारीच्या भरोशावर जिंकता येत नाही. या देशामध्ये राम आणि कृष्ण या देशात असतात.
 राम गंगाराम आयेंगे भव्य मंदिर बनायेंगे. असे नारे राम मंदिर निर्माण होण्याच्या दृष्टीने एक मोठा आंदोलन ,जनांदोलन लोकांना या देशाने बघितलं.
आता त्याच जागेवर माननीय मोदीजींच्या  नेतृत्वात सुप्रीम कोर्टात विजय प्राप्त झाल्यानंतर श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र नावाची समिती तयार झाली. इंद्रजीत मिश्राजी   हे त्याचे महासचिव आहे .आणि योगी श्री गोविंद गिरी महाराज हे कोषाध्यक्ष. जेव्हा वनमंत्री म्हणून माझ्या लक्षात आलं की या मंदिराला हे वैशिष्ट्यपूर्ण मंदिर व्हावं हे मंदिर कमीत कमी पुढचे एक हजार वर्ष. हे मंदिर निश्चितपणे एक हजार वर्षाचा विचार करून या मंदिराचं बांधकाम सुरू झालं.
कोणतही सिमेंट तिथं वापरले गेले.नाही. लोखंड सरी यात वापरलेली नाही गडामध्येच प्रत्येक स्तंभ जुन्या काळात जी लॉकिंग सिस्टीम होती पण याच्या. द्वार महाद्वार गर्भग्रहातील द्वार या सर्व गोष्टींसाठी आणि हे जेव्हा वनमंत्री म्हणून माझ्या लक्षात आलं आमच्या विभागात आम्ही सांगितलं की या मंदिराला काष्ठ टिकूड लाकुड आपलं जावं या दृष्टीने प्रस्ताव  पाठवला.
हे काष्ठ  पसंत करण्यात आलं .इथून मग त्यांनी आपल्याला पुरवठा करण्याचा आदेश दिला. एकीकडे महाराज प्रतापाच्या राजस्थान मधून मंदिर निर्मला साठी दगड .जानतता राजा शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्र मधून आम्हा जिजाऊनी छत्रपती शिवाजी महाराजांना रामायण व महाभारताच्या कथा सांगून धर्माधर्म सध्याची कास कशी धरावी . छत्रपती शिवाजी महाराजांना जे सांगितलं त्या कथा रामायण आणि महाभारताच्या आणि त्याच श्री शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रातून दुसरा संबंध जो महत्त्वाचा आहे. की मूर्ती घडवण्यासाठी ज्या शिला येते त्या जनकपुरी म्हणजे आत्ताच्या नेपाळमधून  म्हणजे प्रभू श्रीरामाच्या सासुरवाडीतून मा सितेच्या माहेरमधून. पण विदर्भाशी सुद्धा प्रभू रामाचं नातंआहे. प्रभू रामाचे पिताश्री  दशरथांची आई  हि  विदर्भातील आहे. म्हणून आजी नातवाचाही संबंध आहे.या ठिकाणी सागवान लाकूड 
शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रातून जातो आहे. 
मनस्वी आनंद होतो एक संकल्प पूर्ण होण्याचा आनंद स्वप्नाची पूर्तता होण्याचा आनंद आणि या दृष्टीने एक आनंद उत्सव हा  चंद्रपूर मध्ये  साजरा केला जातो आहे. साधारणता उद्या साडेतीन ते चार च्या दरम्यान  बल्लारपूरच्या डेपोमध्ये शेकडो लोककलावंत. या जिल्ह्यातील आणि बाहेरील सांस्कृतिक विभागाच्या माध्यमातून या शोभायात्रेत सामील होतील. प्रभू रामचंद्राच्या शोभायात्रा बल्लारपूर शहरातून राज्यातील  1,946 कलावंत  विविध रूपात  सामील होतील.
  या  शोभायात्रेचा दुसरा टप्पा  महाकाली मंदिरापासून साधारणता सहावा ते सातच्या दरम्यान सुरू होईल. शहरातील मुख्य मार्गाने  क्लब ग्राउंड वर  रात्री नऊ पर्यंत पोहोचेल. त्या ठिकाणी कैलाश खेर यांचे सांस्कृतिक  कार्यक्रम  होती.
    या कार्यक्रमासाठी प्रामुख्याने श्री राम मंदिर जय श्रीराम जन्मभूमी क्षेत्रायाचे कोषाध्यक्ष आचार्य गोविंद गिरी महाराज उपस्थित राहणार आहेत .त्या मंदिर निर्माण कामाचे बरोबर आहे. कोषाध्यक्ष यांच्या पूर्ण देशांमध्ये 23 वैदिक पाठशाला. मला उत्तम वैदिक पाठशाळा आहेत. या ठिकाणी जगामध्ये अनेक देशात ईंडोनेशिया गेले थायलंड गेले जपान गेले अशा अनेक ठिकाणी धर्मप्रचाराचा कार्य करतात. ते आचार्य गोविंद गिरी महाराज उपस्थित राहणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे  महाकाली मंदिरापासून या भव्य यात्रेत सामील होणार आहेत. 

छत्रपतींच्या महाराष्ट्रातील काष्ठ आज अयोध्येला रवाना होणार
*

आचार्य गोविंद देव गीरी महाराज, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह नामवंतांची उपस्थिती
 छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रातील सागवन काष्ठ प्रभू श्रीरामचंद्रांच्या अयोध्येला उद्या (बुधवार) रवाना होणार आहे. रामायणात ज्या दंडकारण्याचा उल्लेख आहे त्या दंडकारण्याचा भाग असलेल्या चंद्रपूरमधील सागवन काष्ठ अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या निर्माण कार्यासाठी वापरले जाणार आहे. हे काष्ठ पाठविण्याचा आनंदोत्सव चंद्रपूर आणि बल्लारशामध्ये उद्या बुधवारी साजरा होणार आहे, अशी माहिती राज्याचे वने व सांस्कृतिक कार्यमंत्री तसेच चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. 

या काष्ठपूजन सोहळ्याला श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्रचे कोष्याध्यक्ष आचार्य गोविंददेव गीरी महाराज,महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर,उत्तर प्रदेशचे उच्च व तंत्र  शिक्षण मंत्री श्री.योगेंद्र उपाध्याय स्टॅम्प, न्यायालय शुल्क राज्यमंत्री श्री रविंद्र जायस्वाल वन, पर्यावरण राज्यंत्री (स्वतंत्र प्रभार) डॉ अरुणकुमारजी सक्सेना अभिनेते अरुण गोवील,सुनील लहरी,अभिनेत्री दिपीका चिखलिया या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत.

काष्ठपुजन, शोभायात्रा तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची जय्यत तयारी झालेली आहे. संपूर्ण महाराष्ट्रातील जवळपास दोन हजार कलावंत सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी होणार आहेत, असेही ना. सुधीर मुनगंटीवार म्हणाले. दुपारी ३.३० वाजता बल्लारपूर एफडीसीएम डेपोमध्ये काष्ठपुजन होईल. त्यानंतर चंद्रपूर येथील माता महाकाली मंदिरापासून प्रभू श्रीरामाच्या मंदिरापर्यंत  शोभायात्रेचे आयोजन होईल. रात्री ९.३० च्या सुमारास चांदा क्लब ग्राऊंड शोभायात्रेचा समारोप होणार आहे. त्यानंतर त्याच ठिकाणी रात्री ९.३० वाजता सुप्रसिद्ध गायक कैलाश खेर यांचा रामधून व राम भजनाचा कार्यक्रम होईल.

या ऐतिहासिक सोहळ्यासाठी चंद्रपूर शहर आणि बल्लारपूर शहर सज्ज झाले असून, ठिकठिकाणी होणाऱ्या शोभयात्रेसाठी स्वागतकमानी,पताका,भगवे झेंडे लावण्यात आले असून मार्गावर रामधून सुरू असून वातावरण  राममय झाले आहे. आयोजनासाठी शेकडो कार्यकर्ते स्वयंस्फूर्तीने या परिश्रम घेत आहेत.

*तिरुपती मंदिराने पाठविला प्रसाद*
तिरपती येथील बालाजी मंदिराने १५ हजार मंदिरांचे प्रसाद लाडू भाविकांसाठी पाठविले आहेत. तिरुपती देवस्थानाला आपण सागवन काष्ठ अयोध्येच्या राम मंदिर निर्माणासाठी पाठवत असल्याचे कळविले होते. त्यानंतर त्यांनी सोहळ्याला उपस्थित राहणाऱ्यांसाठी एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रसाद पाठवित असल्याचे सांगितले, अशी माहिती ना. मुनगंटीवार यांनी दिली.

*स्वप्नपूर्तीचा क्षण*
श्रीरामचंद्रांचे पिता महाराज दशरथ यांच्या मातोश्री इंदूमती या विदर्भाच्या. त्यामुळे आजीच्या भूमीतून नातवाच्या मंदिर निर्माणासाठी सागवन काष्ठ जात असल्याचा हा ऐतिहासिक क्षण असणार आहे. संपूर्ण महाराष्ट्रासाठी हा स्वप्नपूर्तीचा क्षण असल्याचे ना. मुनगंटीवार म्हणाले.



  या कार्यक्रमात बांध्यापासून चांद्यापर्यंत असणाऱ्या साऱ्या लोक कला या जिल्ह्यातील लोकांना व विदर्भातील लोकांना पाहता याव्या या दृष्टीने 1,946 कलाकार हा एक मोठा उत्सव साजरा करण्याचा निर्णय  आपण यानिमित्ताने केला. विदर्भातील जनतेला आपल्या सर्वांच्या माध्यमातून विनंती करतो आहे की सर्वात महत्त्वाचा आनंद उत्सवाचा दिवस आहे कामाच्या मंदिरात आम्ही आमचं लाकूड आणि काष्ठ पाठवतो आहे. सर्वांसाठी किंवा या मंदिराच्या नियमानुसार इतिहास लिहिला जाईल. गडचिरोली हा दंडकारण्याच्या प्रदेशाचा उल्लेख हजार वर्ष निश्चित होईल या कार्यक्रमात सर्वांनी सहभागी व्हावं .सर्व जाती धर्माच्या  लोकांनी,सर्वांनी हा आनंद उत्सव साजरा करावा .जाती धर्माच्या लोकांना या कार्यक्रमात पूजेसाठी निमंत्रित केलाय की सर्व जाती धर्माच्या लोकांनी ही पूजा करावी. राम हा एका  धर्माचा नसून राम आणि कसं जगायचं अनु धर्माचा प्रभू रामाचे हे चरित्र आहे .आणि म्हणून या प्रभुरामाच्या चरित्रात निश्चितपणे सर्वांनी आणि या कार्यक्रमांमध्ये उपस्थित राहून शुभेच्छा द्याव्या.  जे काष्ठ आहे त्याची पूजा करून चंद्रपूरकर ,गडचिरोली ,यवतमाळ  वर्धा या भागातील  लोकांनी उपस्थित राहून या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्या अयोध्येच्या मंदिरामध्ये आपणही आपले छोटसं योगदान द्यावं ही विनंती मी आपल्या माध्यमातून सर्वांना करतो .