मनपाच्या आशीर्वादाने मुख्य रस्त्यावर फळ विक्रेत्यांचे बस्तान!




मनपाच्या आशीर्वादाने मुख्य रस्त्यावर फळ विक्रेत्यांचे बस्तान !

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर:-
चंद्रपूर महानगरपालिका अतिक्रमण विभागाच्या वतीने शहरात सध्या मोठ्या प्रमाणात अतिक्रमण हटाव मोहीम सुरू असल्याचे पहावयास मिळत आहे.
मात्र मनपाच्या आशीर्वादाने अंचलेश्वर गेट जवळील झटपट नदीच्या पुलावर काही फळ विक्रेत्याने मनपाच्या आशीर्वादाने आपले बस्तान मांडून बसले आहेत. भर रस्त्यात वरदडीच्या ठिकाणी दुकान थाटल्याने वाहतुकीस कोंडी निर्माण होत असल्याचे चित्र असून. यांच्या अगदी समोर शाळा ,कॉन्व्हेंट असल्याने मुलांना या ठिकाणी जाताना आपला जीव मुठीत घेऊन जावे लागते. अगदी मोक्याच्या ठिकाणी फळ विक्रेत्याने बस्तान मांडल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. पादचाऱ्यांना चालण्यास मोठी आडकाटी निर्माण होत असून भविष्यात या ठिकाणी मोठी दुर्घटना होण्याचे नाकारता येत नाही. या ठिकाणी बस्तान म्हणून बसलेल्या फळ विक्रेत्यांना तात्काळ इथून हटवण्यात यावे, अशी नागरिकांची मागणी होत आहे.या ठिकाणी मोठी दुर्घटना झाल्यास मनपास प्रशासन सर्वश्री जबाबदार राहील.